IPL गाजवणारे 'हे' तीन युवा खेळाडू घेऊ शकतात टीम इंडियात धोनीची जागा!

IPL गाजवणारे 'हे' तीन युवा खेळाडू घेऊ शकतात टीम इंडियात धोनीची जागा!

निवड समितीनं धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर त्याची जागा कोण घेणार यासाठी तयारी सुरु केली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर सध्या चाहते नाराज आहेत. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र मोक्याच्या क्षणी धावबाद झाल्यानंतर भारताच्या आशांवर पाणी फेरले गेले. यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी धोनी निवृत्त झाला नाही तर, त्याला संघातून काढून टाकू असा इशाराही देण्यात आला होता.

दरम्यान, निवड समितीनं धोनीच्या जागा कोण घेणार यासाठी तयारी सुरु केली आहे. धोनी 38 वर्षांचा असल्यामुळे 2023च्या वर्ल्ड कपमध्ये तो भारताकडून खेळण्याच्या शक्यता कमी आहेत. त्यामुळं भारताला पुढच्या वर्ल्ड कपसाठी विकेटकिपर आणि फिनिशर अशा दोन्ही भुमिका बजावणारा खेळाडूची गरज आहे. यात आयपीएल गाजवणाऱ्या या तीन खेळाडूंची वर्णी लागू शकते.

इशान किशन

धोनीच्याच राज्यातील आणि त्याच्याप्रमाणे झारखंडमधून क्रिकेटला सुरुवात करणारा इशान किशन या भारतीय संघासाठी दावेदार असू शकतो. 20 वर्षीय इशान केशननं प्रथम श्रेणी आणि आयपीएल स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2019च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशान किशननं, आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. इशान धोनीसारखाच आक्रमक असून तो, कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो. आयपीएलमध्ये त्यानं विकेटकीपर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळं धोनीच्या निवृत्तीनंतर संघात इशान किशनला जागा मिळू शकते.

वाचा- वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका

ऋषभ पंत

धोनीचा प्रमुख दावेदार म्हणून सध्या तरी ऋषभ पंतचे नाव घेतले जात आहे. वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर पंतला संघात स्थान देण्यात आले होते. सेमीफायनलमध्ये आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पंतनं चांगली फलंदाजी केली. मात्र बेजबाबदार शॉट मारत तो मोक्याच्या क्षणी बाद झाला. दरम्यान विकेटकिपींगमध्ये पंत धोनी एवढा चतुर नसला तरी, भारतासाठी एक चांगला फिनिशर तो होऊ शकतो.

वाचा- विराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...

संजु सॅमसन

एकदिवसीय क्रिकेटमध्ये संजु सॅमसनची निवड आतापर्यंत न झाल्यामुळं चाहते हैराण आहेत. आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना संजुनं चांगली कामगिरी केली आहे. मात्र, 24 वर्षीय संजुनं प्रथम श्रेणीत केवळ 36.81च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. भारताची कमकुवत बाजू असलेल्या चौथ्या क्रमांकाचा तो योग्य दावेदार होऊ शकतो. त्याचरोबर आयपीएलमध्ये विकेटकिपींग करणारा सॅमसन एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी योग्य ठरू शकतो.

वाचा- टी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना

सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

First published: July 21, 2019, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading