मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध हार... आता श्रीलंकेविरुद्ध ‘करो या मरो’ची परिस्थिती

Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध हार... आता श्रीलंकेविरुद्ध ‘करो या मरो’ची परिस्थिती

प्रशिक्षक द्रविडसह रोहित शर्मा

प्रशिक्षक द्रविडसह रोहित शर्मा

Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे अंतिम फेरी गाठायची असेल तर भारताला पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दुबई 5 सप्टेंबर: आशिया चषकातल्या सुपर-4 फेरीतली रंगत आता आणखी वाढणार आहे. सुपर-4 च्या तिसऱ्या लढतीत भारताचा सामना होणार आहे तो श्रीलंकेशी. श्रीलंकेनं अफगाणिस्तानला हरवून या फेरीत दणक्यात सुरुवात केली आहे. आधी बांगलादेश आणि मग अफगाणिस्तानवर विजय अशा सलग दोन सामन्यातल्या विजयी कामगिरीमुळे श्रीलंकन खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी श्रीलंकेचं आव्हान नक्कीच सोपं नसेल. त्यात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे अंतिम फेरी गाठायची असेल तर भारताला पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागणार आहेत.

कसं आहे फायनलचं गणित?

आशिया चषकात सुपर फोरमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान असे चार संघ आहेत. पहिल्या दोन सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्ताननं आपापला पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे सध्या हे दोन्ही संघ टीम इंडियापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. सुपर फोरमध्ये अव्वल दोन संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करतील. पण त्यासाठी किमान दोन विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुढच्या दोन्ही सामन्यात मोठा विजय आवश्यक आहे.

रोहितची रणनीती फसतेय?

दरम्यान टी20 सामन्यात भारतीय संघ पहिल्यापासूनच प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करताना दिसला. रोहितची ही रणनीती इंग्लंड दौऱ्यात फायदेशीर ठरली. पण आशिया चषकात मात्र हीच रणनीती टीम इंडियावर भारी पडली. पाकिस्तानविरुद्ध रोहित आणि राहुलनं अशीच आक्रमक सुरुवात केली. पण दोघेही मोठे फटके खेळण्याच्या नादात लवकर बाद झाले. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाला एका वेगळ्या रणनीतीनं मैदानात उतरण्याची गरज आहे. कारण स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवण्याच्या दृष्टीनं हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी महत्वाचं आहे.

हेही वाचा - Asia Cup 2022: जातीय तेढ वाढवण्यासाठी अर्शदीपला ट्रोल? अर्शदीपला सपोर्ट करण्यासाठी माजी क्रिकेटर्स मैदानात

परफेक्ट प्लेईंग इलेव्हनची गरज

गेल्या लढतीत रवींद्र जाडेजाऐवजी दीपक हुडा आणि आवेश खानऐवजी रवी बिश्नोईला खेळवण्याचा रोहितचा निर्णय चुकला. अक्षर पटेल हा जाडेजासाठी चांगला पर्याय हाताशी असताना रोहितनं दीपक हुडाला संधी दिली. पण गोलंदाजीवेळी त्याला एकही ओव्हर मिळाली नाही. दुसरीकडे युजवेंद्र चहल असताना दुसरा लेग स्पिनर घेऊन रोहित मैदानात उतरला. याही निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत परफेक्ट प्लेईंग इलेव्हन घेऊन मैदानात उतरण्याची गरज आहे.

First published:

Tags: Asia cup, Sport