केएल राहुलच्या फ्लॉप शोनंतर सौरव गांगुलीनं विराटला दिला 'हा' पर्याय!

केएल राहुलच्या फ्लॉप शोनंतर सौरव गांगुलीनं विराटला दिला 'हा' पर्याय!

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघातील एक खेळाडू चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 सप्टेंबर : भारतानं टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसोबत कसोटी मालिकेतही वेस्ट इंडिजला क्लिन स्विप दिला. या कसोटी मालिकेत हनुमा विहारी, मयंक अग्रवाल, विराट कोहली एवढेच नाही तर इशांत शर्मानेही आपली फलंदाजीची झलक दाखवली. मात्र भारतीय संघातील एक खेळाडू चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळं केएल राहुलवर पुन्हा राहुलवर टीका करण्यात येत आहे.

तर, दुसरीकडे पहिल्या कसोटी सामन्यात अपयशी झाल्यानंतरही राहुलला संघात जागा का मिळाली, असा सवालही चाहते विचारत आहेत. वर्ल्ड कप 2019मध्ये रोहित शर्मानं केलेल्या तुफान कामगिरीच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 5 शतक लागवण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. या स्टार सलामी फलंदाजानं वर्ल्ड कपमध्ये 81च्या सरासरीनं वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त म्हणजे 648 धावा केल्या. मात्र तरी, वेस्ट इंडिज विरोधात होत असलेल्या कसोटी दौऱ्यात रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळं चाहते विराट कोहलीवर भडकले आहे.

आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानेसुध्दा केएल राहुलवर टीका केली आहे. गांगुलीनं टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात, “कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सलामीला उतरवण्याचा पर्याय मी याआधीही दिला होता. रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये योग्य संधी मिळालेली नाही. रोहित खुप चांगला खेळाडू आहे, त्याची शैली वेगळी आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरोधात सलामीला उतरवण्यास हरकत नाही”, असे मत व्यक्त केले.

वाचा-India vs West Indies 2nd Test : राहुलने लाज काढली, नेटीझन्स म्हणाले याच्यापेक्षा इशांत शर्मा बरा!वर्ल्ड कप 2019मध्ये रोहित शर्मानं केलेल्या तुफान कामगिरीच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 5 शतक लागवण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. या स्टार सलामी फलंदाजानं वर्ल्ड कपमध्ये 81च्या सरासरीनं वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त म्हणजे 648 धावा केल्या. मात्र तरी, वेस्ट इंडिज विरोधात होत असलेल्या कसोटी दौऱ्यात रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळं चाहत्यांनी इशांत शर्माला सलामीला फलंदाजीसाठी पाठवा अशी मागणी केली आहे.

एका वर्षात राहुलची निराशाजनक खेळी

गेल्या वर्षभरात केएल राहुलनं कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. तब्बल 11 डावांआधी राहुलनं अर्धशतकी खेळी केली होती. राहुलनं ऑक्टोबर 2018मध्ये इंग्लंडमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर आजपर्यंत त्याला एकदाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लड दौऱ्यानंतर भारतीय संघानं तब्बल 10 कसोटी सामने खेळले. यातील 7 सामन्यात राहुलला संघात स्थान देण्यात आले. मात्र ओव्हलमध्ये केलेली 149 धावांची शतकी खेळी वगळता, राहुलला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान इतर कसोटी मालिकांमध्येही राहुलला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही.

वाचा-India vs West Indies : फ्लॉप राहुल चालतो मग रोहित का नाही? चाहत्यांचा विराटवर संताप

वेस्ट इंडिज विरोधात राहुलचा फ्लॉप शो

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यात राहुलनं 3 डावांमध्ये 44, 38 आणि 13 धावा केल्या. मात्र तरी, कसोटी सामन्यात तरी, राहुलला संधी देण्यात येते. त्यामुळं चाहत्यांनी रोहितला संघात जागा का नाही असा सवाल केला आहे.

गांगुलीनं व्यक्त केले होते आश्चर्य

याआधीही संघ निवडीवरून गांगुलीनं नाराजी व्यक्त केली होती. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जाहीर केल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यांच्यामते रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फॉर्मला कसोटी क्रिकेटमध्येही वापरले पाहिजे. मधल्या फळीत रोहित योग्य प्रकारे फलंदाजी करू शकतो, असे मत व्यक्त केले होते. मात्र दोन्ही कसोटी सामन्यात रोहितला संघात जागा दिलेली नाही.

वाचा-India vs West Indies 2nd Test : विराट आता तरी झोपेतून उठ! 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी डोकेदुखी

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

First published: September 5, 2019, 3:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading