Home /News /sport /

IPL 2022 नंतर हे 7 खेळाडू बसणार घरी? द. आफ्रिका दौऱ्यासाठी कट होणार रोहित, राहुल, विराटचाही पत्ता?

IPL 2022 नंतर हे 7 खेळाडू बसणार घरी? द. आफ्रिका दौऱ्यासाठी कट होणार रोहित, राहुल, विराटचाही पत्ता?

भारतीय संघ एक टेस्ट, 3 वन-डे आणि 3 टी-20 सामन्यांची सीरिज खेळण्यासाठी आयर्लंड आणि इंग्लंडला रवाना होईल. तीन आठवड्यांच्या या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी काही बड्या खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई, 26 एप्रिल: आयपीएल टी-20 (IPL 2022) क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक टी-20 सीरिज खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ एक टेस्ट, 3 वन-डे आणि 3 टी-20 सामन्यांची सीरिज खेळण्यासाठी आयर्लंड आणि इंग्लंडला रवाना होईल. तीन आठवड्यांच्या या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी काही बड्या खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा आहे. दैनिक भास्करने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), उपकर्णधार के. एल. राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli), ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली जाऊ शकते. हे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या T-20 सीरिजमधील सर्व मॅच खेळणार नाहीत असं बोललं जातंय. दरम्यान, या सीरिजमध्ये बायो-बबल असणार नाही, अशीही माहिती मिळत आहे. आयपीएलमध्ये यंदा विराट कोहली आणि रोहित शर्माची कामगिरी पाहिल्यास विराटने 8 मॅचमध्ये 119 रन्स काढले असून त्याचा स्ट्राईक रेट 122 आहे. तर, रोहित शर्माने 8 मॅचमध्ये 153 रन काढले असून, स्ट्राईक रेट 126 आहे. हे वाचा-IPLच्या एका मॅचसाठी अंपायर किती मानधन घेतात माहितीये का? वाचा यंदाच्या महागड्या Umpires ची यादी IPL 2022 या यंदाचा हंगाम संपल्यानंतर भारतीय टीमला 9 ते 19 जूनदरम्यान पाच शहरांमध्ये पाच T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची सीरिज खेळायची आहे. यानंतर संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. अशा परिस्थितीत कामाचा ताण लक्षात घेऊन भारताच्या टीममधील मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे असं म्हटलं जातंय. सततच्या सामन्यांमुळे काही खेळाडूंचा फॉर्म हा टीमसाठी कायम चिंतेचा विषय राहिला आहे. T-20 वर्ल्ड कपमध्ये फॉर्म नसलेल्या खेळाडूंसोबत मैदानावर उतरणं, टीमला महागात पडू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय एक प्रभावी वर्कलोड मॅनेजमेंट प्रोग्रॅम तयार करत आहे, जेणेकरुन खेळाडू आयपीएलमध्ये बराच काळ बायो-बबलमध्ये राहिल्यानंतर विश्रांती घेऊन नवीन सुरुवात करत टीम इंडियातून खेळू शकतील. दरम्यान, कोणत्या खेळाडूंना किती दिवस विश्रांती द्यायची, याचा निर्णय टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी बोलल्यानंतरच घेतला जाणार असल्याचंही कळतंय. खरं तर, टीम वर्षाच्या शेवटी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करत आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. आयपीएलच्या बायो-बबल पद्धतीमुळे येणारा थकवा लक्षात घेता खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शिवाय टीम इंडियाला बऱ्याच काळापासून आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकता आलेली नाही आणि यंदाच्या वर्ल्ड कपच्या रुपात ती ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड रणनीती तयार करत आहेत. हे वाचा-IPL 2022 : पोलार्ड मागे फिरला असता तर... कृणालच्या कृत्यावर मुंबईचा खेळाडू भडकला हार्दिक पांड्याबाबत निर्णय होण्याची शक्यता येत्या काळातील सर्व सीरिजमध्ये हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) संधी दिली जाते की नाही, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या हार्दिकचं IPL 15 मधून प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पुनरागमन झालंय. आयपीएलमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. 6 सामन्यांमध्ये त्याने 74 च्या सरासरीने 295 रन्स काढल्या आहेत. यासोबतच तो 145 किमी प्रतितास वेगाने बॉलिंग करत आहे. आयपीएलनंतर हार्दिकची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड होणार की त्याला थेट आयर्लंडमधील T-20 सीरिजमध्ये संधी दिली जाणार, यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
First published:

Tags: Cricket, Ipl 2022, Jasprit bumrah, Kl rahul, Rohit sharma, Team india, Virat kohli

पुढील बातम्या