'भारतात वशिलाच पाहिजे, कामगिरीला कोण विचारत नाही', अर्जुन पुरस्कार न मिळाल्यानं खेळाडूनं केला गंभीर आरोप

'भारतात वशिलाच पाहिजे, कामगिरीला कोण विचारत नाही', अर्जुन पुरस्कार न मिळाल्यानं खेळाडूनं केला गंभीर आरोप

पुरस्कारासाठी आपलं नाव नसल्याचं समजल्यानंतर खेळाडूनं ट्विट करून म्हटलं की, सर्वात वाईट याचं वाटतं की आपण काहीच बोलू शकत नाही. देशात तुमच्या कामगिरीला काहीच महत्त्व नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : अर्जुन पुरस्कारासह राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली. यामध्ये अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्यानं भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयनं पुरस्कार समितीवर आरोप केले आहेत. त्यानं म्हटलं आहे की, पुरस्कार मिळण्यासाठी तुमचा वशिला पाहिजे. जो तुमच्या कामगिरी पेक्षा नावाला पुढं करेल.

भारतीय बॅडमिंटन संघाने प्रणॉयशिवाय बी साई प्रणीत, मनु अत्री यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र 12 सदस्यांच्या निवड समितीनं प्रणीतला अर्जुन पुरस्कारासाठी निवडलं. यामध्ये वेगवेगळ्या खेळातील 19 खेळाडूंची निवड केली आहे. कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि पॅराअॅथलीट दीपा मलिकला खेल रत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आलं आहे.

प्रणॉयनं म्हटलं आहे की, जर तुम्हाला पुरस्कार मिळावं असं वाटत असेल तर तुमच्याकडे असे लोक असेल जे तुमचं नाव पुरस्कारांच्या यादीत टाकू शकतील. आपल्या देशात कामगिरीला फारसं महत्त्व दिलं जात नाही. सर्वात वाईट याचं वाटतं की आपण काहीच बोलू शकत नाही.

एचएस प्रणॉयनं 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं होतं तर आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष एकेरीत कांस्यपदक पटकावलं होतं.

पुरस्कार आणि विजेते

राजीव गांधी खेल रत्न - बजरंग पुनिया ( कुस्ती) व दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट)

द्रोणाचार्य पुरस्कार - विमल कुमार ( बॅडमिंटन), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन ( अॅथलिट)

जीवनगौरव पुरस्कार - मेर्झबान पटेल ( हॉकी), रंबीर सिंग खोक्कर ( कबड्डी), संजय भरद्वाज ( क्रिकेट)

अर्जुन पुरस्कार - तजिंदरपाल सिंग तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनास याहीया ( अॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), रवींद्र जडेजा ( क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान ( हॉकी), अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), पूनम यादव ( क्रिकेट), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल ( पोलो)

ध्यानचंद पुरस्कार - मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी)

VIDEO: सेफ्टी बेल्ट, दोरीचा आधार न घेता 68 मजल्याच्या इमारतीवर चढला गिर्यारोहक; कारण...!

First Published: Aug 18, 2019 09:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading