नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya in IPL 2021) फिटनेस सातत्याने चर्चेत आहे. त्यातच आणखी एक भर म्हणजे, सध्या आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये असणारा नवा युवा खेळाडु व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer performance in IPL 2021). त्याने पदार्पण करताच जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे अनफिट पांड्याला आयसीसी वर्ल्डकप (Hardik Pandya To Be Dropped From India’s T20 World Cup Squad) संघातून डच्चू देतात की काय अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यानंतर लगेचच आयसीसी वर्ल्डकप 2021 ला सुरूवात होतेय. पांड्याला भारतीय 15 सदस्यीयसंघात एक ऑलराऊंडर म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. त्याच्या फलंदाजीसोबतच गोलंदाजीचीही अपेक्षा केली जात आहे. मात्र पांड्या सध्याच्या टप्प्यात गोलंदाजी करण्यास न उतरल्याने त्याच्या संपूर्णपणे फिट असण्यावर सवाल केले जात आहेत.
हे वाचा-पाकिस्तान क्रिकेटला 24 तासांमध्ये 2 धक्के, नव्या अध्यक्षांची डोकेदुखी वाढली
अशातच, आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) पदार्पण केलेल्या व्यंकटेश अय्यर यानं जबरदस्त कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. फलंदाजीसोबतच व्यंकटेश अय्यरने गोलंदाजीतही कमाल करुन दाखवली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात व्यंकटेशनं केलेल्या जबरदस्त गोलंदाजीनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते.
स्थानिक T-20 करिअरमध्ये व्यंकटेशची कामगिरी उल्लेखनीय
व्यंकटेशने दिल्ली कॅपिटल्सच्या शिमरन हेटमायर आणि अक्षर पटेल यांची विकेट घेतली. त्याने 4 षटकांमध्ये 29 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय स्थानिक T-20 करिअरमध्ये व्यंकटेशची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यानं आतापर्यंत 41 सामन्यांमध्ये 21 बळी घेतले आहेत. तर फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये 7 आणि 24 ए लिस्ट सामन्यांमध्ये 10 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे आपल्या अष्टपैलू कामगिरीने व्यंकटेश आता आयसीसी वर्ल्डकपमध्ये अनफिट पांड्याची जागा घेऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे.
हे वाचा-IND W vs AUS W: ऐतिहासिक टेस्टमध्ये स्मृतीचा धमाका, भारताची दमदार सुरूवात
10 ऑक्टोबरपर्यंत बदलाचे पर्याय
मुंबईचे गोलंदाजी कोच शेन बॉन्ड यांचे म्हणणे आहे हार्दिक पांड्याला पूर्णपणे मॅच फिटनेस मिळवण्यासाठी काही वेळ पाहिजे आणि त्यासाठी मुंबईच्या दोन सामन्यांमध्ये त्याला बाहेर ठेवण्यात आले. आरसीबीविरुद्द जेव्हा पांड्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये निवडण्यात आले तेव्हा हे कन्फर्म होते की गोलंदाजी करण्याची गरज नाही. दरम्यान, संघांकडे 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या टी-20 वर्ल्डकप संघात बदल करण्याचा पर्याय आहे. जर पांड्या सामन्यात चार ओव्हर टाकण्यासही असमर्थ ठरला तर बदल केले जाऊ शकतात.
T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, T20 world cup