सचिन विरोधातलं ट्वीट ICCला पडलं महागात, जगभरातील नेटीझन्सनं काढली इज्जत!

सचिन विरोधातलं ट्वीट ICCला पडलं महागात, जगभरातील नेटीझन्सनं काढली इज्जत!

आयसीसीनं नुकतेच सचिन आणि बेन स्टोक्स यांच्याबाबत एक वादग्रस्त ट्वीट केले आहे.

  • Share this:

लंडन, 28 ऑगस्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सनं अविश्वसनीय कामगिरी केली. या कामगिरीमुळं बेन स्टोक्स सध्या सर्वोश्रेष्ठ फलंदाज ठरला आहे. अॅशेस मालिकेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी स्टोक्सनं तुफानी अशी 135 धावांची खेळी केली. यामुळं इंग्लंडनं एका विकेटच्या जोरावर हा सामना जिंकला. त्याच्या या खेळीमुळं आयसीसी रॅकिंगमध्येही त्याला फायदा झाला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्टोक्स सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातच आता स्टोक्सला इंग्लंडमधील सर्वोत्तम अशी नाईटहूड ही पदवी देण्याची मागणी होत आहे. मात्र आयसीसीनं स्टोक्सबाबत केलेल्या एका ट्वीटनं भारतीय चाहत्यांना निराश केले.

आयसीसीनं बेन स्टोक्सचे कौतुक करताना नुकतेच एक ट्वीट केले. मात्र यात त्यांनी महान फलंदाज सचिन तेंडुलरकरचा अपमान केला. या प्रकारामुळं भारतीय चाहते नाराज झाले आहेत. आयसीसीनं केलेल्या ट्विटमध्ये, सचिन आणि बेन स्टोक्स यांचा फोटो टाकत त्यावर स्टोक्सला जगातला सर्वोत्तम फलंदाज असे म्हटले आहे. त्यामुळं सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्ती केली.

स्टोक्सनं आयसीसी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात 84 धावांची विजयी खेळी केली होती. स्टोक्सच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी आयसीसीनं सचिन आणि स्टोक्स यांचा फोटो शेअर केला. नुकताच आयसीसीनं हा व्हिडिओ पुन्हा रिशेअर केला. यामुळं चाहत्यांनी आयसीसीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सामन्यानंतर बिअर पीत केली पार्टी

क्रिकेटमध्ये अशा रोमांचक विजयानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष साजरा करतात मात्र इंग्लंडच्या खेळाडूंनी एक भलताच प्रयोग केला. अॅशेस मालिकेतील विजयानंतर इंग्लंडच्या खेळाडूंना हेडिंग्ले मैदानात बिअर पीत आपला जल्लोष साजरा केला. इंग्लंडच्या खेळाडूंची ही बिअर पार्टी सुरू असताना दर्शक उपस्थित नव्हते. मात्र सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत. इंग्लंडच्या एक समालोचकानं हे फोटो अपलोड केले होते. दरम्यान चाहत्यांनी यावर खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करताना काळजी घ्यावी असे ट्वीट केले आहेत.

135 वर्षांनंतर इंग्लंडन केली अजब कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, मार्नस लॅबुशचॅग्ने ( 80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र बेन स्टोकनं ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवल्या. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव 67 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर चौथ्या डावात त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं विजय मिळवला. याआधी 131 वर्षांपूर्वी 1888 मध्ये 67 पेक्षा कमी धावा केल्यानंतरही विजय मिळवला होता.

चॉकलेट आणि फ्राईड चिकनमुळे इंग्लंडला मिळाला ऐतिहासिक विजय

इंग्लंडनं 359 धावांचा पाठलाग करताना, 286 धावांवर नऊ विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी स्टोक्स 61 धावांवर खेळत होता. त्यानंतर बेननं चक्क 135 धावांची अनपेक्षित खेळी केली. त्याच्या सोबत जॅक लीचनं केवळ 1 धावा काढत 76 धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान सामन्यानंतर स्टोक्सला अशी अविश्वसनीय खेळी खेळण्याआधी रात्री डोक्यात काय विचार होते असे विचारले असता स्टोक्सनं, “रात्री मी माझी पत्नी आणि मुलांसोबत होते. मला रात्री अचानक फ्राईड चिकन आणि चॉकलेट खाण्याची इच्छा झाली आणि सकाळी कॉफी प्यायलो”, असे सांगितले. तसेच, “आम्हाला माहित होते की हा सामना हातातून गेला तर, मालिका हातातून जाणार. जेव्हा दहव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात उतरला तेव्हा आम्हाला 70 धावा करायच्या होत्या. त्यावेळी मी फक्त सामना जिंकायचा आहे एवढाच विचार केला”, असे सांगत आनंद व्यक्त केला.

गुंडांचा त्रास, अखेर दाम्पत्याने घेतले पेटवून; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या