खूशखबर! Article 370 हटवल्यामुळे आता भारताला मिळणार 'हा' नवा संघ

कलम 370 हटवल्यामुळं क्रिकेट विश्वालाही त्याचा फायदा होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 03:08 PM IST

खूशखबर! Article 370 हटवल्यामुळे आता भारताला मिळणार 'हा' नवा संघ

काश्मीर, 06 ऑगस्ट : केंद्र सरकारनं सोमवारी ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 मध्ये बदल करण्याची शिफारस केली. यामुळं आता कलम 370 हटवल्यास काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा राहणार नाही तर नवा केंद्रशासित प्रदेश म्हणून लडाख अस्तित्वात येणार आहे. यामुळं आता जम्मू आणि काश्मीर राज्याची स्वतंत्र पोलिस यंत्रणा उरणार नाही. तसेच, तिथे केंद्राच्या अखत्यारित पोलिस यंत्रणा असेल. नवा कायदा लागू करायचा झाला तर त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज नसेल. त्यामुळं केद्र सरकार राज्यातील कायदा करू शकेल. तसेच कलम 370 हटवल्यानं संपत्ती खरेदी आणि गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.

मात्र आता कलम 370 हटवल्यामुळं क्रिकेट विश्वालाही त्याचा फायदा होणार आहे. या कलमामुळं लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळं आता दिल्ली आणि चंदिगड प्रमाणे लडाखही बीसीसीआयच्या मदतीनं क्रिकेट बोर्ड तयार करू शकतो. त्यामुळं लडाखला रणजी क्रिकेट खेळण्याची संधी मिळू शकते. म्हणजे येत्या रणजी चषकात आणखी एक नवा संघ सामिल होण्यासाठी सज्ज आहे, असे म्हणायला हरकत नाही.

वाचा-'काश्मीरच्या लोकांसाठी मी आनंदी', भारताच्या युवा क्रिकेटपटूनं केलं ट्वीट

लडाखमधून भारताला मिळणार अनेक नवे खेळाडू

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला आपला संघ तयार करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. याआधी 1970मध्ये बीसीसीआयनं जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली होती. त्यामुळं आता लडाखमधील युवा खेळाडूंना जम्मू-काश्मीरकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.

Loading...

वाचा-'अगदी बरोबर बोललास पण...', काश्मीर मुद्द्यावरून गंभीरने आफ्रिदीला घेतलं फैलावर

राबवले जाणार विविध प्रकल्प

आता थेट केंद्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये विकासाचे प्रकल्प राबवणार आहे. तसेच त्यांची दिल्लीसारखी परिस्थिती होणार आहे. हे कलम हटवल्यानं भ्रष्टाचाराला आळा बसेल असा दावा सरकारने केला आहे. काश्मीरला यापुढे स्वतंत्र झेंडा लावता येणार नाही. दिल्लीप्रमाणे काश्मीरसुद्धा केंद्रशासित प्रदेश होईल. इथलं कामकाज उपराज्यपालाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अखत्यारीत होईल.

वाचा-काश्मीरवर ऐतिहासिक निर्णयानंतर शाहिद आफ्रिदी संयुक्त राष्ट्रसंघावर भडकला!

VIDEO: तो एक क्षण आणि थोडक्यात बचावले मुख्यमंत्री!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 03:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...