'देशासाठी बंदुक हातात घेईन', आफ्रिदीवर भडकला हरभजन सिंग

'देशासाठी बंदुक हातात घेईन', आफ्रिदीवर भडकला हरभजन सिंग

पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं नुकताच पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यानं पुन्हा एकदा काश्मीरवरून तारे तोडले.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मे : पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं नुकताच पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यानं पुन्हा एकदा काश्मीरवरून तारे तोडले. आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वक्तव्य केलं होतं. यावर भारतीय क्रिकेटपटूंनी पलटवारही केला. आता गौतम गंभीरनंतर फिरकीपटू हरभजनसिंगसुद्धा आफ्रिदीवर भडकला आहे.

आफ्रिदीने साऱ्या सीमा ओलांडल्या असल्याचं हरभजन सिंग इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला. आपल्या देशाबाबत आणि पंतप्रधानांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर बोलणं सहन केलं जाणार नाही असा इशाराही हरभजनने दिला. काही दिवसांपूर्वी हरभजन सिंग आणि युवराज सिंगने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाहिद आफ्रिदीच्या फाउंडेशला मदत करण्यासाठी अपील केलं होतं.

हरभजन सिंग म्हणाला की, मी या देशात जन्माला आलो आणि इथंच शेवटचा श्वास घेणार आहे. देशासाठी 20 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. मी देशाविरोधात काही केलं आहे असं कोणी म्हणू शकत नाही. आज किंवा उद्या जर गरज पडली सीमेवरही जाईन. देशासाठी बंदूक हातात घेईन.

सलमानच्या नावानं फसवणूक करत होती महिला, अभिनेत्यानं केला पर्दाफाश

शाहिद आफ्रिदीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पातळी सोडली. खरंतर त्याच्या फाउंडेशनला आम्हीच लोकांना दान करा असं आवाहन केलं. ते फक्त माणुसकीच्या नात्यानं केलं होतं असंही हरभजनसिंग म्हणाला.

हे वाचाा : बँक लॉकरमध्ये ठेवलं होतं सोनं, काढायला गेला तेव्हा निघाले दगड

हरभजन सिंगने म्हटलं की, आफ्रिदी आपल्या देशाबद्दल वाईट विचार करतो. मला एवढंच सांगायचं आहे की आफ्रिदीशी आमचं काही देणं घेणं नाही. आमच्या देशाविरुद्ध काहीही बोलण्याचा त्याला अधिकार नाही. आता त्याच्यासोबत कसलेच संबंध नाहीत असंही हरभजन सिंगने स्पष्ट केलं.

हे वाचा : अभिनेत्याची आई कोरोना पॉझिटीव्ह; पण रुग्णालयात बेड मिळेना

First published: May 17, 2020, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading