मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

नीरज चोप्राचा अनोखा सन्मान! ज्यादिवशी गोल्ड जिंकलं आता तो दिवस असणार Javelin Throw Day

नीरज चोप्राचा अनोखा सन्मान! ज्यादिवशी गोल्ड जिंकलं आता तो दिवस असणार Javelin Throw Day

टोकयो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympic 2020) स्पर्धा नुकती पार पडली. या स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचत सुवर्ण पदक पटकावले. जगभरातून त्याचं कौतुक होत आहे, दरम्यान त्याचा एक अनोखा सन्मान करण्यात आला आहे

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: टोकयो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympic 2020) स्पर्धा नुकती पार पडली. या स्पर्धेत भालाफेक (Javelin Throw) या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचत सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले. ॲथलेटिक्स प्रकारात भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाल्यानं नीरज चोप्रावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा विविध पुरस्कारांनी ठिकठिकाणी सन्मान केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या (Federation Of Indian Athletics) समितीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात आता दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन (Javelin Throw Day) म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. जाणून घेऊया याविषयी...

नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिक 2020 मध्ये 7 ऑगस्टला भालाफेकीच्या अंतिम सामन्यामध्ये सुवर्णपदक पटकावले. यासोबतच विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी यश मिळवले. त्यानिमित्ताने टोकयो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय ट्रॅक अँड फिल्ड ॲथलिट्सच्या सत्कार समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. देशातील जास्तीत जास्त युवा खेळाडू भालाफेक या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित व्हावे, या उद्देशाने भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (AFI) 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. याबाबतची माहिती भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या योजना आयोगाचे अध्यक्ष ललित भनोत यांनी या समारंभात दिली. नीरज चोप्राने या घोषणेचे स्वागत केले असून, हा सन्मान मिळाल्यानं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना त्याने व्यक्त केली.

हे वाचा-T20 World Cup साठी टीमची निवड करणारा पहिला देश, दिग्गज खेळाडूला केलं बाहेर

यावेळी बोलताना नीरज म्हणाला की, माझे काही थ्रो खराब गेले होते. भालाफेक (Javelin Throw) ही खूप तांत्रिक (Technical) गोष्ट असते. मला सर्वोत्तम कामगिरी करायची, हाच विचार माझ्या मनात ठामपणे होता.

हे वाचा-शाहरुखच्या हिरोने इतिहास घडवला, क्रिकेट विश्वात हा विक्रम करणारा पहिलाच

सत्कार समारंभादरम्यान बोलताना नीरजने सांगितले की मी लवकरच 90 मीटर थ्रोचा रेकॉर्ड माझ्या नावावर करणार आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये हे शक्य झाले नाही. परंतु, तिथं पदक मिळवणं अधिक महत्वाचं होतं आणि अगदी तसंच झालं. या स्पर्धेत आपल्याला पदक मिळलं आणि तेही सुवर्ण हेच मोठं वैशिष्ट्यपूर्ण म्हणावं लागेल. कोणत्याही खेळाडूनं एका पदकावर समाधानी राहू नये. मी यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. यापुढेही देखील कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला अशीच कामगिरी करायची आहे.

First published:

Tags: Olympics 2021