नवी दिल्ली 12 ऑक्टोबर: आयसीसी टी-20 वर्ल्डकपला (T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) जगातील टॉप-5 टी-20 (T20) क्रिकेटपटूंची निवड केली आहे. राशिदने या यादीत दोन भारतीय क्रिकेटपटूंना स्थान दिले आहे, पण फिनिशर किंग एम एस धोनी आणि हिटमॅन रोहित शर्माचा समाविष्ट नाही.
राशिदच्या यादीत भारताचे दोन खेळाडू, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे त्याने 12.63 च्या टी-20 सरासरी आणि 6.21 ची इकॉनॉमी आणि 17.62 व 6.35 चा एकूण टी-20 रेकॉर्ड असूनही राशिदने स्वतःला या यादीतून वगळले आहे.
खानला जेव्हा विचारण्यात आले की वर्ल्ड टी-20 इलेव्हनसाठी त्याची टॉप-5 आवडीचे खेळाडू कोणते आहेत तेव्हा त्याने पाच खेळाडूंची नावे आणि त्यांचा समावेशाचे कारण सांगितले. त्याच्या या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे. तसेच, केन विलियमसन, एबी डिविलियर्स आणि कायरन पोलार्ड यांनादेखील राशिदने टॉप-5 मध्ये स्थान दिले आहे.
खेळातील सर्वात महान क्रॉस-फॉरमॅट फलंदाजांपैकी एक, कोहली टी-20 क्रिकेटमध्ये अतुलनीय आहे. पुरुष टी-20 मध्ये कोहलीच्या 3,159 पेक्षा जास्त अन्य कोणत्याही खेळाडूने धावा केलेल्या नाहीत. सर्व पुरुषांच्या टी-20 मध्ये त्याची सरासरीने (41.21) 11 व्या स्थानावर आहे परंतू तो त्या यादीत त्याच्यापेक्षा पुढे 100 पेक्षा जास्त डाव खेळला आहे.
भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या गोलंदाजी करत नाही, पण हार्दिकच्या नावावर 2728 धावा आहेत आणि 27.28 च्या सरासरीने 110 विकेट्स आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलियर्सच्या नावावर 9 हजार 424 धावा आहेत. तर कायरन पोलार्डने या फॉरमॅटमध्ये 11 हजार 236 धावा केल्या आहेत. केन विल्यमसन आणि राशिद खान आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादमध्ये बराच काळ एकत्र खेळले. विल्यमसनने टी -20 फॉरमॅटमध्ये 5 हजार 429 धावा केल्या आहेत.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी टी-20 वर्ल्ड स्पर्धेसाठी त्यांचा अंतिम 15 सदस्यीय संघ घोषित केला आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी स्पर्धेसाठी संभाव्य संघ जाहीर झाल्यानंतर स्टार लेग स्पिनर राशिद खानने राजीनामा दिला. त्यानंतर, एसीबीच्या (ACB) अधिकाऱ्यांनी नवीन तालिबान राजवटीत मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup