• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • आमच्याविरुद्ध ODI सीरिज खेळा, अफगाणिस्तानने या देशाला दिली ऑफर!

आमच्याविरुद्ध ODI सीरिज खेळा, अफगाणिस्तानने या देशाला दिली ऑफर!

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष अजीजुल्ला फाजली यांनी शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानला वनडे सीरिज खेळण्याची (Afghanistan offer to Pakistan) ऑफर दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष अजीजुल्ला फाजली यांनी शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानला वनडे सीरिज खेळण्याची (Afghanistan offer to Pakistan) ऑफर दिली आहे. यासाठी ते याच आठवड्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अजीजुल्ला फाजली यांची पुनर्नियुक्तीही तालिबानच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याचं वृत्त आहे, त्यामुळे तालिबानच्या सांगण्यावरूनच पाकिस्तानला वनडे सीरिजची ऑफर दिल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे अफगाणिस्तान पाकिस्तानला वनडे सीरिजची ऑफर देत असली, तरी अफगाणिस्तानच्या टीमवर बहिष्काराची मागणी जोर धरू लागली आहे. तालिबानने महिलांच्या खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे अफगाणिस्तानचा टेस्ट दर्जाही धोक्यात आला आहे. आयसीसीच्या नियमानुसार टेस्ट दर्जा मिळवण्यासाठी देशाच्या महिला आणि पुरुष टीम असणं गरजेचं आहे. दुसरीकडे या वर्षाच्या शेवटी अफगाणिस्तानची पुरुष टीम ऑस्ट्रेलियात एक टेस्ट खेळण्यासाठी जाणार आहे, पण महिला क्रिकेटवर बंदी घालण्यात आली, तर हा दौराही रद्द करण्यात येईल, असा इशारा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिला आहे. पोट धरून हसाल; ओम प्रकाश मिश्रामुळे न्यूझीलंडने रद्द केला पाकिस्तान दौरा! अफगाणिस्तानच्या टी-20 वर्ल्ड कपमधल्या सहभागाबाबतही शंका निर्माण होत आहे. आयसीसीने वर्ल्ड कपसाठी प्रत्येक देशाला आपला राष्ट्रध्वज द्यायला सांगितला आहे. यामध्ये जर अफगाणिस्तानने तालिबानचा झेंडा दिला, तर आयसीसीचे इतर सदस्य देश यावर आक्षेप नोंदवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये आयसीसीने तातडीची बैठक घेण्याची तयारीही दर्शवली आहे. ...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार! फाजली घेणार राजांची भेट अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अजीजुल्ला फाजली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (PCB Chairman Ramiz Raja) यांची भेट घेणार आहेत आणि वनडे सीरिज खेळण्याची ऑफर देणार आहेत. अफगाणिस्तानची टीम सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेत पाकिस्तानविरुद्ध खेळणार होती, पण श्रीलंकेत कोरोना रुग्ण वाढल्यामुळे ही सीरिज रद्द करण्यात आली. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधली सीरिज 2023 वनडे वर्ल्ड कप लीगचा भाग होती. सप्टेंबर 2018 ते जुलै 2019 पर्यंत बोर्डाची सेवा केल्यानंतर फाजली पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. मंगळवारी अफगाणिस्तानने हामिद शिनवारी यांना मुख्य कार्यकारी पदावरून बरखास्त केलं. त्यांच्याऐवजी हक्कानी नेटवर्कच्या नसीब जादरान यांची नियुक्ती करण्यात आली. तालिबानच्या प्रभावामुळेच ही नियुक्ती करण्यात आल्याचं बोललं जात आहे. न्यूझीलंडने रद्द केला पाकिस्तान दौरा, पण बिर्याणीचं बिल 27 लाख रुपये! पाहा कोणी मारला ताव
  Published by:Shreyas
  First published: