रस्ते अपघातात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गंभीर जखमी, 24 तासांपासून बेशुद्ध

रस्ते अपघातात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गंभीर जखमी, 24 तासांपासून बेशुद्ध

रस्ते अपघातामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

मुंबई : रस्ते अपघातामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अफगाणिस्तान (Afghanistan)चा ओपनर नजीबुल्लाह तारकई (Najeebullah Tarakai)पूर्व नंगरहारमध्ये रस्ता क्रॉस करत असताना एका गाडीने त्याला धडक दिली. 29 वर्षांचा नजीम सध्या आयसीयूमध्ये आहे, तसंच त्याची प्रकृती नाजुक आहे, अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अंतरिम अध्यक्ष नजीम जर अब्दुलरहीमजई यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितलं.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार नजीबुल्लाह सध्या कोमामध्ये आहे. त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताच्या 24 तासानंतरही नजीबुल्लाह बेशुद्ध आहे. त्याला जलालाबाद शहरात एका गाडीने धडक दिली होती.

तारकईने मार्च 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याने अफगाणिस्तानसाठी 12 टी-20 आणि एक वनडे मॅच खेळली आहे. टी-20 मध्ये त्याने 4 अर्धशतकांसह 258 रन केल्या आहेत. तारकईने 24 प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 47.20च्या सरासरीने 2030 रन केले आहेत. यात 6 शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

17 लिस्ट ए मॅचमध्ये तारकईने 32.52 च्या सरासरीने 553 रन केले आहेत, यात एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 33 टी-20 मॅचमध्ये त्याने 127.50 च्या स्ट्राईक रेटने 700 रन केले आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्याने शापागिजा क्रिकेट लीगमध्ये मीस आयनक नाईट्सचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

माध्यमांमध्ये आलेल्या दुसऱ्या वृत्तानुसार अफगाणिस्तानचेच आयसीसी अंपायर बिस्मिल्लाह जन शिनवारी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात शनिवारी एक स्फोट झाला. या स्फोटामध्ये जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले.

Published by: Shreyas
First published: October 4, 2020, 4:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading