सोशल मीडियावर क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकनं मृत्यू, ट्विटरवर झाला खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल झाली क्रिकेटपटूच्या मृत्यूची बातमी.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 01:26 PM IST

सोशल मीडियावर क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकनं मृत्यू, ट्विटरवर झाला खुलासा

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : सोशल मीडियावर कोणत्या घटना व्हायरल होतात याचा काही नेम नाही. कधी कधी सेलिब्रिटींच्या मृत्यूच्या खोट्या बातम्याही सोशल मीडियावर पसरवल्या जातात. यातच आता एका क्रिकेटपटूच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या बातमीमुळं चाहत्यांनी त्याच्या घरच्यांनाही सांतवन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर खेळाडूला स्वत: आपल्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे ट्विटरवर सांगावे लागले.

सोशल मीडियावर खोटी मृत्यूची बातमी व्हायरल झालेल्या खेळाडूचे नाव आहे अफगाणिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद नबी. काही दिवसांपूर्वी मोहम्मद नबीच्या एका फोटोसह त्याच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाली होती. यात नबीला हद्यविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान जेव्हा 34 वर्षीय मोहम्मद नबीला ही बातमी कळली, तेव्हा त्यानं या वृत्ताचे खंडन केले. त्यानं ट्वीट करत मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले.

मोहम्मद नबीनं आपल्य़ा अधिकृत ट्विटर हॅंडलवर एक ट्वीट केले होते. यात, “देवाच्या कृपेने मी ठिक आहे. माझ्या मृत्यूची बातमी मीडियामध्ये आली आहे, जी फेक आहे”, असे लिहिले होते. नबीच्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं नबीच्या ट्रेनिंग सेशनचा फोटो पोस्ट केला होता. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं यावर, काबिल स्टेडियमवर नबी ट्रेनिंग घेत आहे. मोहम्मद नबीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. बांगलादेश विरोधात त्यानं एकमेव कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर नबीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

नबीनं अफगाणिस्तानकडून एकूण 3 कसोटी सामने खेळले आहेत. त्यानं भारताविरोधात 2018मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जो अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना होता. तर, आयर्लंड विरोधात अफगाणिस्ताननं पहिला कसोटी विजय मिळवला. त्यानंतर बांगलादेशला नमवत कसोटी क्रिकेटमधून नबीनं संन्यास घेतला.

VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: afganistan
First Published: Oct 5, 2019 01:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...