मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Asia Cup 2022: पाच वेळा आशिया कप जिंकणाऱ्या श्रीलंकेला अफगाणिस्तानचा दणका, 8 विकेट्सनी धुव्वा

Asia Cup 2022: पाच वेळा आशिया कप जिंकणाऱ्या श्रीलंकेला अफगाणिस्तानचा दणका, 8 विकेट्सनी धुव्वा

अफगाणिस्तानची विजयी सलामी

अफगाणिस्तानची विजयी सलामी

Asia Cup 2022: अफगाणिस्तान संघानं श्रीलंकेचा 8 विकेट्सनी पराभव करुन आशिया चषकात विजयी सलामी दिली. या सामन्यात श्रीलंकेनं दिलेलं 106 धावांचं माफक आव्हान अफगाणिस्ताननं 10.1 षटकातच पूर्ण केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दुबई, 27 ऑगस्ट: मोहम्मद नबीच्या अफगाणिस्तान संघानं श्रीलंकेचा 8 विकेट्सनी पराभव करुन आशिया चषकात विजयी सलामी दिली. या सामन्यात श्रीलंकेनं दिलेलं 106 धावांचं माफक आव्हान अफगाणिस्ताननं 10.1 षटकातच पूर्ण केलं. सलामीच्या हजरतउल्ला झाझाई आणि रेहमतुल्ला गुरबाज यांनी 83 धावांची सलामी दिली. झाझाईनं नाबाद 37 धावांची केली केली. तर गुरबाजनं 18 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 40 धावा फटकावल्या. गुरबाज हसरंगाच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्यानंतर आलेल्या इब्राहिम झादराननं 15 धावा केल्या. पण तो विजयासाठी 3 धावा हव्या असताना रन आऊट झाला. त्यानंतर झाझाई आणि नाजिबुल्ला झादराननं विजयी सोपस्कार पूर्ण केले. पण पाच वेळा आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेसाठी मात्र यंदाच्या स्पर्धेची सुरुवात अतिशय खराब झाली.

श्रीलंकन फलंदाजांची दाणादाण

त्याआधी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी श्रीलंकेची दाणादाण उडवली. अफगाणिस्तानच्या भेदक आक्रमणासमोर श्रीलंकेचा डाव 19.4  षटकात अवघ्या 105 धावांत आटोपला. या सामन्यात अफगाणिस्ताननं सुरुवातीपासूनच श्रीलंकेवर वर्चस्व गाजवलं. पहिल्या षटकापासूनच श्रीलंकेचे एकेक फलंदाज ड्रेसिंग रुममध्ये परतले. या स्थितीतून श्रीलंकेचा संघ शेवटपर्यंत सावरु शकला नाही. लंकेकडून भानुका राजपक्षेनं सर्वाधिक 38 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या फझल फारुकीनं 11 धावात 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबीनं आणि मुजीब उर रेहमाननं प्रत्येकी 2 तर नवीन उल हकनं एक विकेट घेतली.

हेही वाचा - Asia Cup 2022: बीसीसीआयने शेअर केले 11 खेळाडूंचे फोटो, हीच आहे पाकविरुद्धची प्लेईंग XI?

पंचांचा वादग्रस्त निर्णय

दरम्यान या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पण श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. कारण वेगवान गोलंदाज फझल फारुकीनं आपल्या पहिल्याच षटकात कुशल मेंडिस आणि चरिथा असलंका या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळे पहिल्याच षटकात श्रीलंकेची 2 बाद 3 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एका श्रीलंकेच्या पथुन निसंकाला एका धक्कादायक निर्णयाला सामोरं जावं लागलं. अफगाणिस्तानकडून दुसरं षटक घेऊन आला तो नवीन उल हक. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर निसंकानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण बॉल थेट विकेट कीपरच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. पण त्यावर विकेट कीपर आणि बॉलरनं कॅचचं जोरदार अपील केलं आणि अंपायर अनिल चौधरी यांनी ते अपील उचलून धरताना निसंकाला बाद ठरवलं. पण निसंकानं डीआरएस घेतला आणि निर्णय थर्ड अंपायरकडे गेला.

स्निको मीटरमध्ये फ्लॅट लाईन

थर्ड अंपायरनं डिसिजन रिव्ह्यू केलं. पण फ्रेममध्ये बॅट आणि बॉल यांचा स्पर्श होत नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. स्निको मीटरवर एक सरळ रेषा दिसत होती. ज्याचा सरळसरळ अर्थ होतो नॉट आऊट. पण असं असूनही तिसरे पंच जयरामन मदनगोपाल यांनी अनिल चौधरी यांचा निर्णय कायम ठेवला. पण या निर्णयानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी मात्र निराशा व्यक्त केली.

First published:

Tags: Asia cup, Cricket, T20 cricket