Home /News /sport /

क्रीडा विश्व हादरलं, रस्ते अपघातात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू; 3 दिवस होता कोमात

क्रीडा विश्व हादरलं, रस्ते अपघातात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू; 3 दिवस होता कोमात

29 वर्षीय नजीबुल्लाह आयसीयूमध्ये होता. अपघातानंतर नजीबुल्लाह कोमात होता. त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती.

    नंगरहार (अफगाणिस्तान), 06 ऑक्टोबर : क्रिकेट विश्वाला हादरून सोडणारी एक घटना घडली आहे. अफगाणिस्तान संघाचा (Afghanistan) सलामीवीर नजीबुल्लाह तारकाई (Najeebullah Tarakai) याचे आज सकाळी निधन झाले. काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात नजीबुल्लाह गंभीर जखमी झाला होता. पूर्व नंगरहारमध्ये रस्ता क्रॉस करत असताना एका गाडीने त्याला धडक दिली. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती गंभीर होती, मात्र अफगाणिस्तान क्रिकेट बोडार्नं नजीबुल्लाहच्या निधनाची बातमी ट्वीट करत सांगितली. 29 वर्षीय नजीबुल्लाह आयसीयूमध्ये होता. अपघातानंतर नजीबुल्लाह कोमात होता. त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. तारकईने मार्च 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याने अफगाणिस्तानसाठी 12 टी-20 आणि एक वनडे मॅच खेळली आहे. टी-20 मध्ये त्याने 4 अर्धशतकांसह 258 रन केल्या आहेत. तारकाईने 24 प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 47.20च्या सरासरीने 2030 रन केले आहेत. यात 6 शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 17 लिस्ट ए मॅचमध्ये तारकाईने 32.52 च्या सरासरीने 553 रन केले आहेत, यात एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 33 टी-20 मॅचमध्ये त्याने 127.50 च्या स्ट्राईक रेटने 700 रन केले आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्याने शापागिजा क्रिकेट लीगमध्ये मीस आयनक नाईट्सचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या