‘या’ जाहिरातीत एमएस धोनी करतोय लोकांची दिशाभूल, होऊ शकते शिक्षा

जुन्या गाड्यांची विक्री करणारी कंपनी Cars 24 च्या जाहिरातीवर दिशाभूल करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जानेवारी :  जुन्या गाड्यांची विक्री करणारी कंपनी Cars 24 च्या जाहिरातीवर दिशाभूल करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघातील विकेट किपर महेद्रंसिंह धोनी या कंपनीची जाहिरात करतो. भारतीय जाहिरात मानक परिषदेच्या दाव्यानुसार Cars 24 ही कंपनी प्रेक्षकांची फसवणूक करीत आहे. या जाहिरातीनुसार या कंपनीच्या माध्यमातून जुनी कार विकल्यानंतर लगेचच पैसे दिले जातात. मात्र भारतीय जाहिरात मानक परिषदेनुसार २६४ लोकांनी ही जाहिरात दिशाभूल करीत असल्याचं सांगितलं आहे. एमएस धोनी या कंपनीचा ब्रॅंड अम्बॅसॅडर असून या कंपनीत त्याने गुंतवणूकही केली आहे. अशा परिस्थितीत या कंपनीच्या जाहिरातीत काही चुकीचे घडत असेल तर त्यासाठी त्यालाही जबाबदार धरण्यात येते.

यापूर्वीही आम्रपाली ग्रुप विवादात धोनी अडकला होता. गेल्या वर्षी २७ नोव्हेंबर रोजी आम्रपाली विवादात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला होता, यामध्ये धोनीचेही नाव होते. आम्रपाली ग्रुपवर पैसे घेऊन घरे न दिल्याचा आरोप आहे. आम्रपाली ग्रुपवर लोकांकडून २६४७ कोटी रुपयांचा निधी घेऊन तो दुसऱ्या प्रकल्पात लावल्याचाही आरोप आहे. एमएस धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रॅंड अम्बॅसॅडर असल्याने या प्रकरणात अडकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading