VIDEO : हरभजनची हॅट्ट्रिक झाली नसती, 18 वर्षांनी गिलख्रिस्टनं व्यक्त केलं दु:ख

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं हॅट्ट्रिक नोंदवली होती. कसोटीत अशी कामगिरी करणारा हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांच्यानंतर तिसरा भारतीय गोलंदाज ठरला होता.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 02:29 PM IST

VIDEO : हरभजनची हॅट्ट्रिक झाली नसती, 18 वर्षांनी गिलख्रिस्टनं व्यक्त केलं दु:ख

मुंबई, 04 सप्टेंबर : विंडिजविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं हॅट्ट्रिकची नोंद केली. कसोटीत अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी हॅट्ट्रिक केली आहे. दरम्यान, हरभजनच्या हॅट्ट्रिकवरून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू अॅडम गिलख्रिस्टनं दु:ख व्यक्त केलं आहे.

हरभजन सिंगनं 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इडन गार्डनवर हॅट्ट्रिक केली होती. अशी कामगिरी करणारा हरभजन भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला होता. त्यावेळी डीआरएस सिस्टीम असती तर हरभजनची हॅट्ट्रिक झाली नसती. तेव्हा डीआरएस नसल्यानं वाइट वाटत असल्याची प्रतिक्रिया अॅडम गिलख्रिस्टनं दिली आहे.

भारतानं त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावला होता. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजी ढेपाळली होती. ऑस्ट्रेलियानं सलग 16 कसोटी जिंकण्याची कामगिरी केली होती. इडन गार्डनवर भारताविरुद्ध विजय मिळवून त्यांना विक्रम नोंदवायचा होता.

ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 252 धावा केल्या होत्या. तेव्हा हरभजन सिंगनं सलग तिन गडी बाद करून ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 बाद 252 केली. यावेळी त्यानं रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना बाद केलं होतं. मात्र, गिल ख्रिस्ट त्याच्या बाद असण्याबद्दल साशंक होता.

Loading...

गिलख्रिस्टनं एका व्हिडिओवर कमेंट केली आहे. यामध्ये रिप्लेमध्ये दिसत आहे की, गिलख्रिस्टच्या पॅडला लागण्यापूर्वी चेंडू बॅटला लागला होता. पंचांना ही गोष्ट दिसली नाही. त्यावेळी रिव्ह्यू नव्हता त्यामुळं मैदान सोडावं लागलं होतं.

भारतानं पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात धक्का दिला होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 धावा केल्या. त्यानंतर 171 धावांवर भारताचा पहिला डाव संपुष्टात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं भारताला फॉलोऑन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं द्रविड आणि लक्ष्मण यांच्या भक्कम भागिदारीच्या जोरावर 7 बाद 657 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 212 धावांत गुंडाळून भारातनं 171 धावांनी सामना जिंकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 4, 2019 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...