• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • या ऑस्ट्रेलियन खेळाडूमुळे रोहित बेस्ट कॅप्टन! भारतीय क्रिकेटपटूने सांगितली Inside Story

या ऑस्ट्रेलियन खेळाडूमुळे रोहित बेस्ट कॅप्टन! भारतीय क्रिकेटपटूने सांगितली Inside Story

विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारतीय टीमचं नेतृत्व आलं आहे. टीमचं नेतृत्व स्वीकारताच रोहितने भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिले.

 • Share this:
  मुंबई, 21 नोव्हेंबर : विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारतीय टीमचं नेतृत्व आलं आहे. टीमचं नेतृत्व स्वीकारताच रोहितने भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिले, तसंच भारताने मालिकाही जिंकली. रोहित शर्मा आयपीएलमधला (IPL) सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने (Mumbai Indians) सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. रोहितच्या या नेतृत्व गुणांमुळे त्याला आता भारताच्या टी-20 टीमचंही नेतृत्व देण्यात आलं. विराटच्या नेतृत्वात या टी-20 वर्ल्ड कपमधली टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. यानंतर आता ऑस्ट्रेलियात होणारा पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या वर्ल्ड कपसाठी टीम तयार करताना रोहितच्या नेतृत्व गुणांचा कस लागणार आहे. रोहित शर्मा बेस्ट कर्णधार कसा झाला, याबद्दलची इनसाईड स्टोरी त्याचा एकेकाळचा सहकारी आणि भारताचा माजी स्पिनर प्रग्यान ओझाने (Pragyan Ojha) सांगितली आहे. रोहित शर्मा बेस्ट कॅप्टन होण्यामागे ऑस्ट्रेलियाचा विकेट कीपर एडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) महत्त्वाची भूमिका बजावल्याचं ओझाने सांगितलं. आयपीएलच्या पहिल्या मोसमात रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) टीममध्ये होता, तेव्हा गिलख्रिस्ट टीमचा कर्णधार होता. डेक्कन चार्जर्सकडे अनेक दिग्गज खेळाडू असतानाही गिलख्रिस्टने रोहितमधलं टॅलेंट ओळखलं आणि त्याला टीमचं उपकर्णधार बनवलं, असं ओझा म्हणाला. 2011 साली रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आला, यानंतर 2013 साली रिकी पॉण्टिंगकडून रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचं नेतृत्व स्वीकारलं, याच मोसमात मुंबई पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन झाली. पुढे 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबई इंडियन्सने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता 2022 च्या मोसमाआधी पुन्हा एकदा खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मुंबई इंडियन्स रोहित शर्माला कॅप्टन म्हणून कायम राहील, हे निश्चित आहे, त्यामुळे रोहितला पुन्हा नव्याने मुंबई इंडियन्सची टीम बांधावी लागणार आहे. लिलावाआधी प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवता येणार आहेत.
  Published by:Shreyas
  First published: