मॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं घेतले विराट आणि धोनीचे नाव, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं घेतले विराट आणि धोनीचे नाव, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

तमिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये लागलेल्या फिक्सिंगच्या आरोपानंतर क्रिकेट हा खरच जेंटलमन गेम आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : तमिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये लागलेल्या फिक्सिंगच्या आरोपानंतर क्रिकेट हा खरच जेंटलमन गेम आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 2013मध्ये आयपीएलमध्ये झालेल्या फिक्सिंगनं भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे वारे शिरले आहे. आता हा वाद आणखीच चिघळत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं नेमून दिलेल्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सोमवारी तामिळनाडु प्रीमीयर लीगमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचे सांगितले. दरम्यान या आरोपावरून काही जणांची चौकशी सुरू झाली आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयच्या वतीनं भ्रष्टाचार विरोधी समितीची नेमणुक केली आहे. यासाठी राजस्थानचे माजी पोलिस महासंचालक आणि सध्याचे बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रमुख अजित सिंग हे चौकशी करणार आहेत. दरम्यान नुकतेच अजित सिंह यांनी युवा खेळाडूंना काय करावे आणि काय करू नये, याबाबत सांगितले.

अजित सिंह यांनी आयएएलएसला दिलेल्या मुलाखतीत, “सट्टेबाज सामना फिक्स करण्यासाठी कधीच विराट कोहली किंवा महेंद्रसिंग धोनी यांच्या मागे लागत नाही. ते नेहमी युवा खेळाडूंना आपल्या जाळ्यात अडकवतात. युवा खेळाडूंना कळत नाही की आपल्यासोबत काय होत आहे, आणि ते अडकत जातात. विराट, धोनी सारखे स्टार खेळाडू यात कधीच अडकत नाही, कारण त्यांचे नाव असते आणि ते बदनाम होण्याची, करिअर संपण्याची त्यांना भीती असते. मात्र, युवा खेळाडूंसाठी ही एक संधी असते”, असे सांगितले.

वाचा-संघावर झाला होता फिक्सिंगचा आरोप, माजी क्रिकेटपटूनं केली आत्महत्या?

कोण आहेत अजित सिंग

अजिंत सिंग हे 1982च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दरम्यान 2018मध्ये अजिंत सिंग निवृत्ती झाल्यानंतर त्यांनी नियुक्त बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीच्या प्रमुखपदी करण्यात आली. त्यांनी दिल्लीचे पोलिस महासंचालक निरज कुमार यांची जागा घेतली. अजित सिंग यांची ओळख राजस्थानमधील टॉप कॉप अशी केली जाते. अजिंत सिंग यांनी पोलिस संचालक म्हणून जलावर, सवाई माधोपूर, जोधपूर, जयपूर आणि शिरोही काम केले होते. दरम्यान त्यांनी या प्रकरणात इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “काही खेळाडूंनी आमच्याशी संपर्क केला असून आम्ही त्यांच्याशी ज्यांनी संपर्क केला ते तपासत आहे. यात काही मेसेज व्हॉटस्अॅपवर आले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे”, असे सांगितले.

वाचा-भारतीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग? BCCI नाही तर 'हा' टॉप कॉप लावणार छडा!

टीएलपीएलमध्ये भारतीय खेळाडूंचा भरणा

आतापर्यंत अनेकदा लहान स्पर्धांमध्ये अशा केस समोर आल्या आहेत. पण पहिल्यांदाच बीसीसीआयकडून मान्याता दिलेल्या स्पर्धेत असा प्रकार समोर आला आहे. टीएलपीएलमध्ये 8 संघ आहेत. यामध्ये भारतीय संघातील आर अश्विन, मुरली विजय, विजय शंकर, दिनेश कार्तिक, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडूही खेळतात.टीपीएलमध्ये मॅच फिक्सिंगसाठी प्रशिक्षकाला एका सट्टेबाजानं हिऱ्यांचा सेट दिला. त्याआधी प्रशिक्षकानं 25 लाख रुपयांचा सौदा ठरण्यापूर्वी एक एसयुव्ही कार मागितली होती अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारताचा युवा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये?

मॅच फिक्सिंग प्रकरणात युवा खेळाडू असल्याची धक्कादायक माहिती एसीयुनं दिली आहे. या खेळाडूची शिफारस एका दिग्गज क्रिकेटपटूनं केली होती. तसेच त्याच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक मदतही संघ मालकांनी त्याला केली होती अशी माहिती समजते. अद्याप कोणाचीही नावे समोर आलेली नाहीत.

वाचा-भारताच्या महिला क्रिकेटरकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, दोघांविरोधात तक्रार दाखल

VIDEO : शरद पवारांची सोलापुरात तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2019 08:14 PM IST

ताज्या बातम्या