मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /संजय मांजरेकरांना विराट, सचिन नव्हे तर 'हा' खेळाडू वाटतो ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन

संजय मांजरेकरांना विराट, सचिन नव्हे तर 'हा' खेळाडू वाटतो ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन

स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान मांजरेकर यांना विचारण्यात आलं होतं की, 'विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील 'ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन' तुम्ही कोणाला मानता?’ त्यावर मांजरेकर यांनी त्यांचं मत मांडलं.

स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान मांजरेकर यांना विचारण्यात आलं होतं की, 'विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील 'ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन' तुम्ही कोणाला मानता?’ त्यावर मांजरेकर यांनी त्यांचं मत मांडलं.

स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान मांजरेकर यांना विचारण्यात आलं होतं की, 'विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील 'ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन' तुम्ही कोणाला मानता?’ त्यावर मांजरेकर यांनी त्यांचं मत मांडलं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 29 जानेवारी : वन-डे क्रिकेटमध्ये ऑल-टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन कोण? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला, तर अनेकजण लगेच सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, अशी भारतीय फलंदाजांची नावं घेतील. अर्थात या भारतीय फलंदाजांची कामगिरीही तशीच आहे. पण भारतीय क्रिकेट टीममधील माजी खेळाडू आणि नावाजलेले समालोचक संजय मांजरेकर यांना ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन हा भारताचा नव्हे तर दुसऱ्याच एका देशाचा वाटतो.

    मांजरेकर यांनी नुकताच त्यांचा ऑल टाइम ग्रेटेस्ट वन-डे बॅट्समन निवडला आहे. स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान मांजरेकर यांना त्यांचा वन-डे क्रिकेटमधील ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन निवडण्यास सांगण्यात आलं होतं. मांजरेकर यांना विचारण्यात आलं होतं की, 'विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील 'ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन' तुम्ही कोणाला मानता?’ त्यावर मांजरेकर यांनी त्यांचं मत मांडलं.

    ते म्हणाले,'हे दोन्ही बॅट्समन त्यांच्या त्यांच्या काळातील ग्रेटेस्ट बॅट्समन आहेत. पण माझ्या मते, वेस्ट इंडिजचा दिग्गज व्हिवियन रिचर्ड्स हा वन-डे क्रिकेटमधील ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन आहे. रिचर्ड्सनं टेस्ट क्रिकेट आणि वन-डे क्रिकेट मॅचमध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केली ती जबरदस्त होती आणि आपण त्याच्या रेकॉर्डवर नजर टाकली, तर तो कसा बॅट्समन होता, याचा अंदाज येतो. तो नेहमीच माझा ऑल टाइम ग्रेटेस्ट वन-डे बॅट्समन राहील'.

    मांजरेकर रिचर्ड्स बदल काय म्हणाले...

    रिचर्ड्सबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले, 'रिचर्ड्सचा त्याच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारचा प्रभाव होता, तो आश्चर्यकारक होता. तो 70 आणि 90 च्या दशकात अशा वेळी खेळला, जेव्हा सर्व टॉप-क्लास बॅट्समन, गॉर्डन ग्रीनिज सारख्यांची सरासरी 30 च्या आसपास आणि स्ट्राइक रेट 60 च्या आसपास होता. 70 ते 90 च्या दशकापर्यंत रिचर्ड्सची सरासरी 47 आणि त्याचा स्ट्राइक रेट 90 होता. त्यामध्ये वर्ल्डकपमधील शतकाचाही समावेश आहे. त्याची बॅटिंग जगाला हादरवायची.’

    मांजरेकर पुढे म्हणाले की, ‘सध्याच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली निश्चितपणे एक ग्रेटेस्ट बॅट्समन आहे. तो गेल्या 20 वर्षांपासून ग्रेटेस्ट बॅट्समनच्या यादीत आहे. तेंडुलकर हा देखील ऑल टाइम ग्रेटेस्ट खेळाडूंपैकी एक आहे. माझ्या दृष्टिने सध्याच्या काळात विराट कोहली एक ग्रेटेस्ट वन-डे बॅट्समन म्हणून फिट बसतो. माझ्या मनात यासाठी आणखी एक खेळाडू येतो, तो दुसरा कोणी नसून एमएस धोनी आहे. पण ऑल टाईम ग्रेटेस्ट वन-डे बॅट्समनचा विचार केला, तर रिचर्ड्सच्या जवळपास यापैकी कोणीही नाही'. मांजरेकर यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वास वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू रिचर्ड्स याची चर्चा सुरू झाली आहे.

    First published:

    Tags: Cricket, Cricket news, Sachin tendulkar, Team india, Virat kohli