भारत-पाक सेमीफायनलमध्ये भिडणार, पुन्हा होणार इतिहासाची पुनरावृत्ती?

भारत-पाक सेमीफायनलमध्ये भिडणार, पुन्हा होणार इतिहासाची पुनरावृत्ती?

पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर ‘मौका-मौका’, भारतीय संघ करणार इतिहासाची पुनरावृत्ती.

  • Share this:

ढाका, 18 नोव्हेंबर : भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. भारत-पाक यांच्यातील सामने मैदानापेक्षा, मैदानाबाहेर जास्त चर्चिले जातात. आता पुन्हा एकदा भारत-पाक आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघामध्ये कोणतीही मालिका होत नसल्यामुळं ही लढत फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये दिसते.

दरम्यान सध्या बांगलादेशमध्ये होत असलेल्या ACC Emerging Asia Cup 2019मध्ये भारत-पाक यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत आशियाई खंडातील संघ सामिल होणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारताचा अंडर-23 संघ सामिल होणार आहे. यात भारताचे नेतृत्व युवा खेळाडू शरत रवि करणार आहे. आशियाई कपचा सेमिफायनलचा सामना भारत-पाकमध्ये होणार आहे.

वाचा-टीम इंडिया पडली उघडी; ICC रँकिंग पाहून तुम्ही सांगा टी-20 वर्ल्ड कप जिंकणार कसा?

भारत-पाकिस्तान यांच्यातील अंडर-23मध्या इमरजिंग आशियाई कप 2019चा पहिला सेमीफायनल सामना ढाका येथे होणार आहे. 20 नोव्हेंबरला बांगलादेशच्या शेर-ए-बांग्ला मैदानावर हा सामना होईल. भारतानं हॉगकॉंग तर पाकने ओमनला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळं आता भारत-पाकमध्ये जो संघ सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीत पोहचेल.

वाचा-IPLमध्ये एकही विजेतेपद न मिळालेल्या विराटला रोहित, धोनीपेक्षा मिळतो जास्त पगार

भारतानं आतापर्यंत केली आहे शानदार खेळी

ACC Emerging Asia Cup 2019 स्पर्धा ही 8 संघांमध्ये होत आहे. यात 4-4चे दोन गट करण्यात आले आहेत. यात भारतीय संघ ब गटात तर पाकचा संघ अ गटात होता. भारतानं पहिल्याच सामन्यात नेपाळला 7 विकेटनं मात दिली. तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला 6 विकेटनं नमवले. तर तिसऱ्या सामन्यात हॉंगकॉंगला 120 धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर, दुसरीकडे पाकिस्तानच्या अंडर-23 संघानं आपल्या गटातील तिन्ही सामने जिंकले. पाकनं अफगाणिस्तान, श्रीलंका आणि ओमन यांना पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

वाचा-सोशल मीडियावरची पोस्ट पडली महागात, एका फोटोनं संपवलं क्रिकेटपटूचं करिअर

First published: November 18, 2019, 7:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading