एक, दोन नव्हे तर 16 भारतीय क्रिकेटपटू दुसऱ्या देशाकडून खेळणार!

एक, दोन नव्हे तर 16 भारतीय क्रिकेटपटू दुसऱ्या देशाकडून खेळणार!

भारतीय क्रिकेटपटू अबु धाबीमध्ये होत असलेल्या टी-10 लीगमध्ये खेळण्यास उत्सुक आहेत.

  • Share this:

मुंबई: भारतीय संघाला 2011मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणारा सिक्सर किंग युवराज सिंग निवृत्तीनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे. युवराजनं निवृत्ती घेतल्यानंतर कॅनडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली. या स्पर्धेत युवीनं आपला दणका दाखवून दिला. असे असले तरी, युवी कर्णधारपद भुषवत असलेला संघ टोरंटो नॅशनल संघाचे स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आले. दरम्यान मीडिया रिपोर्ट्स नुसार, युवी आता अबु धाबीमध्ये होत असलेल्या टी-10 लीगमध्ये खेळणार आहे.

टी-10 लीगचे प्रमुख शाजी उल मुल्क नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनी युवराजसह 16 माजी खेळाडूंसोबत करार केले जाणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवीनं वेगवेगळ्या लीग खेळण्यास सुरुवात केली. आता तो अबु धाबीमध्ये होत असलेल्या टी-20 लीगमध्ये खेळणार आहे. 15 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत अबु धाबीच्या शेख जायद या क्रिकेट मैदानात खेळवली जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेत 16हून अधिक भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

वाचा-भारताच्या स्टार खेळाडूनं सोडला देश, आता इंग्लंडमधून खेळणार क्रिकेट!

मुल्क यांनी याबाबत माहिती देताना, “आमचे लक्ष्य युवराज सिंगसोबत करार करणे आहे. युवराजसोबत चर्चा सुरू आहे, तो या स्पर्धेसाठी इच्छूक असेल” असे सांगितले. तसेच, “गेल्या वर्षी काही भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदा टी-10 लीगमध्ये भाग घेतला होता. त्यामुळं यंदा जास्तीत जास्त भारतीय खेळाडूंचा समावेश करण्याचे आमचे ध्येय आहे”, असे मुल्क यांनी सांगितले. युवराजसोबत नुकतीच निवृत्ती जाहीर केलेला अंबाती रायडूही खेळणार आहे. त्याचबरोबर भारताचा जलद गोलंदाज इरफान पठाणही या स्पर्धेत खेळणार आहे.

दरम्यान, वर्ल्ड कप 2019मध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड करूनही रायडूला संघात घेतले नव्हते. त्यामुळं वर्ल्ड कप सुरू होताच रायडूनं निवृत्ती जाहीर केली होती मात्र त्यानंतर रायडूनं यु-टर्न घेत क्रिकेट खेळत राहणार असल्याचे मत व्यक्त केले होते.

वाचा-दिग्गज गोलंदाज अडकला SEX रॅकेटमध्ये, गर्लफ्रेंड आणि इतर महिलांसोबत घातला धिंगाणा

खेळाडूंसाठी ही असणार मोठी संधी

15 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे. युएईमध्ये खेळलेल्या या लीगचे याआधी दोन हंगाम झाले आहेत. ज्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉग मॉर्गन, शेन वॉटसन, लसिथ मलिंगा आणि आंद्र रसेल यांसारखे खेळाडू खेळले आहेत. तर, पहिल्याच हंगामात भारतीय खेळाडू जहीर खान, आरपी सिंह आणि प्रवीण तांबे यांचा समावेश होता.

वाचा-91 कसोटी सामने, 125 डावांनंतर राखली इशांत शर्मानं लाज!

VIDEO : VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक

Published by: Akshay Shitole
First published: September 1, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading