Home /News /sport /

39 बॉलमध्ये 96 रन ठोकूनही प्लेयर म्हणतो, 'हे तर लाजिरवाणं', जाणून घ्या का?

39 बॉलमध्ये 96 रन ठोकूनही प्लेयर म्हणतो, 'हे तर लाजिरवाणं', जाणून घ्या का?

12 फोर, 5 सिक्स आणि 246 चा स्ट्राईक रेट... अबु धाबीमध्ये सुरू असलेल्या टी10 लीगमध्ये (Abu Dhabi T10 league) इंग्लंडचा बॅटर टॉम कोहलर कॅडमोरने Tom Kohler-Cadmore) कहर केला आहे.

    मुंबई, 2 डिसेंबर : 12 फोर, 5 सिक्स आणि 246 चा स्ट्राईक रेट... अबु धाबीमध्ये सुरू असलेल्या टी10 लीगमध्ये (Abu Dhabi T10 league) इंग्लंडचा बॅटर टॉम कोहलर कॅडमोरने (Tom Kohler-Cadmore) कहर केला आहे. विरोधी टीमचा एकही बॉलर कॅडमोरसमोर टिकला नाही. कॅडमोरचं टी10 इतिहासातलं पहिलं शतक फक्त 4 रननी हुकलं. इनिंगच्या शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कॅडमोर 39 बॉलमध्ये 96 रन करून आऊट झाला. कॅडमोरच्या या ऐतिहासिक खेळीमुळे त्याची टीम डेक्कन ग्लॅडिएटर्सने बांगला टायगर्सचा 62 रनने पराभव केला. कॅडमोरने टी10 लीगच्या इतिहासातली सगळ्यात मोठी खेळी केली, पण तो या फॉरमॅटमधलं शतक करण्यापासून चुकला. कॅडमोरलाही याचं दु:ख आहे. 'हे खरंच लाजिरवाणं आहे. तुम्ही इतक्या जवळ पोहोचल्यानंतरही शतक करू शकत नाही. टी10 मधलं पहिलं शतक करण्याचा रेकॉर्ड मला करता आला असता तर चांगलं झालं असतं. पण खेळ नेहमीच असा असतो. टीमसाठी योगदान दिल्याबद्दल मात्र मी खूश आहे,' असं कॅडमोरने सांगितलं. या सामन्यात बांगला टायगर्सचा कॅप्टन फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plesis) टॉस जिंकून डेक्कन ग्लॅडिएटर्सना बॅटिंगला बोलावलं. ओपनिंगला आलेल्या कॅडमोरने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन फोर मारून आपले इरादे स्पष्ट केलं. ही ओव्हर मोहम्मद आमिरने टाकली होती, यानंतर फाफ डुप्लेसिसने फक्त बॉलर बदलले, पण कॅडमोरचं आक्रमण तसंच सुरू राहिलं. पुढच्या ओव्हरमध्ये त्याने एक सिक्स आणि एक फोर मारली. 18 बॉलमध्ये त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कॅडमोरने 39 बॉलमध्ये 96 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 5 सिक्स आणि 12 फोरचा समावेश होता, म्हणजेच त्याने बाऊंड्रीच्या माध्यमातून 78 रन काढले. शेवटच्या ओव्हरमध्ये शतक करण्यासाठी कॅडमोरला 4 रन पाहिजे होते, पण ल्यूक वेडने तिसऱ्या बॉलला कॅडमोरची विकेट घेतली. कॅडमोरच्या टीमने 10 ओव्हरमध्ये 140 रन केले. डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या बांगला टायगर्सना 10 ओव्हरमध्ये फक्त 78 रन करता आल्या. या तेवढ्याच रन होत्या जेवढ्या कॅडमोरने आपल्या इनिंगमध्ये बाऊंड्रीच्या मदतीने केल्या. बांगला टायगर्सची टीम कॅडमोरने केलेल्या रनच्याही मागे राहिली, ज्यामुळे त्यांचा 62 रनने मोठा पराभव झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या