Home /News /sport /

"Absolutely Heartbreaking" स्टार खेळाडूंना MI ने धक्का देताच, Rohit Sharma ची अशी होती रिअ‍ॅक्शन

"Absolutely Heartbreaking" स्टार खेळाडूंना MI ने धक्का देताच, Rohit Sharma ची अशी होती रिअ‍ॅक्शन

Rohit Sharma

Rohit Sharma

इंडियन प्रीमीयर लीग 2022(IPL2022)साठीच्या लिलावापूर्वी खेळाडू कायम करण्याची प्रक्रिया मंगळवारी (३० नोव्हेंबर) पार पडली.

  नवी दिल्ली, 2 डिसेंबर: नुकतंच आगामी आयपीएल 2022 (IPL2022) साठी 8 संघाना नियामानुसार आपापल्या 4 खेळाडूंनी रिटेन केले आहे. त्यानुसार मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians)देखील त्यांचे 4 खेळाडू संघात कायम केले आहेत. तर संघातील स्टार खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. याबद्दल संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमधील ५ वेळचे विजेते मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा(Rohit Sharma ), जसप्रीत बुमराह(Jasprit Bumrah), सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav) आणि कायरन पोलार्ड(pollard) या 4 खेळाडूंना संघात कायम केले आहे. मात्र, यामुळे हार्दिक पंड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, इशान किशन अशा अनेक स्टार खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात आला आहे. संघाने घेतलेल्या या भूमिकेमुळे रोहित शर्मा नाराज झाल्याचे पाहायल मिळाले आहे. यासंदर्भात त्याने दुःख व्यक्त करत प्रतिक्रीया दिली आहे.

  "Absolutely Heartbreaking"

  रोहित शर्मा म्हणाला, ‘जसं की आपल्याला माहित आहे की, मुंबई इंडियन्ससाठी हे कठीण रिटेंशन होते. आमच्याकडे खूप चांगले खेळाडू आणि बंदूकीसारखे आक्रमक खेळाडू होते. त्यांना संघातून मुक्त करणे, हे हृदय तोडण्यासारखे होते. त्यांनी या फ्रँचायझीसाठी खूप चांगली कामगिरी केली होती आणि खूप आठवणी निर्माण केल्या होत्या. त्यामुळे त्यांना संघातून जाऊ देणे कठीण होते. माझ्यासह चार खेळाडूंना संघात कायम केले असून आाशा आहे की आम्ही आमच्याभवती एक चांगला आणि मजबूत संघ तयार करु.’ अशी आशाही त्याने यावेळी व्यक्त केली आहे. तसेच तो पुढे म्हणाला, ‘सध्या नजीकचे ध्येय हेच आहे की आम्ही लिलावातून एक चांगला संघ तयार करु शकू. आम्ही लिलावातून कोणाला संघात घेऊ शकतो, यावर आमचे लक्ष असेल. योग्य जागेसाठी योग्य खेळाडूची निवड केली जाईल. आमच्या टॅलेंट हंट टीमने भारतातील आणि भारताबाहेरील चांगल्या क्रिकेटपटूंवर लक्ष ठेवले आहे. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात चांगले प्रतिभाशाली खेळाडू शोधण्याचे चांगले काम केले आहे. आशा आहे की आम्ही चांगले खेळाडू शोधून एक उत्कृष्ट संघ तयार करु शकू.’ असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 16 कोटींमध्ये, जसप्रीत बुमराहला 12 कोटींमध्ये, सूर्यकुमार यादवला 8 कोटींमध्ये आणि कायरन पोलार्डला 6कोटींमध्ये संघात कायम केले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सकडे आयपीएल लिलावासाठी एकूण 48 कोटी रुपये शिल्लक आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Hardik pandya, Ipl 2022 auction, Jasprit bumrah, Mumbai Indians, Rohit sharma, Suryakumar yadav

  पुढील बातम्या