मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धक्कादायक! मॅच सुरू असतानाच छातीत दुखायला लागलं, पाकिस्तानी खेळाडू मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये!

धक्कादायक! मॅच सुरू असतानाच छातीत दुखायला लागलं, पाकिस्तानी खेळाडू मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये!

पाकिस्तानचा ओपनर आबिद अलीला (Abid Ali) मॅच सुरू असतानाच रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. पाकिस्तानमधली प्रथम श्रेणी स्पर्धा असलेल्या कायदे आझम ट्रॉफीच्या (Quaid E Azam Trophy) सामन्यादरम्यान आबिद अलीच्या छातीत दुखायला लागलं.

  • Published by:  Shreyas

कराची, 21 डिसेंबर : पाकिस्तानचा ओपनर आबिद अलीला (Abid Ali) मॅच सुरू असतानाच रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. पाकिस्तानमधली प्रथम श्रेणी स्पर्धा असलेल्या कायदे आझम ट्रॉफीच्या (Quaid E Azam Trophy) सामन्यादरम्यान आबिद अलीच्या छातीत दुखायला लागलं. मध्य पंजाबकडून खेळत असताना आबिदने दोनवेळा छातीत दुखत असल्याची तक्रार केली, यानंतर टीम मॅनेजर अशरफ अली यांनी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं.

'आबिद अली सकाळी 61 रनवर खेळत होता, तेव्हा त्याने दोन वेळा छातीत दुखत असल्याचं सांगितलं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं योग्य ठरेल, असं आम्हाला वाटलं, कारण तिकडे त्याची योग्य तपासणी केली जाईल,' असं पाकिस्तानचे माजी टेस्ट विकेट कीपर असलेले अशरफ अली म्हणाले. यूबीएल परिसरात खैबर फखतुनख्वा टीमकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 9 हजार रन पूर्ण करणारा आबिद अली नुकताच मध्य पंजाब टीमशी जोडला गेला. पाकिस्तानच्या बांगलादेश दौऱ्यात आबिदने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर आबिद अलीला अक्युट कॉर्नरी सिन्ड्रोम असल्याचं समोर आलं आहे. हृदयाला रक्त पुरवठा करण्याच्या मार्गात ब्लॉक म्हणजेच अडथळा येतो, त्याला अक्युट कॉर्नरी सिन्ड्रोम म्हणतात.

डॉन न्यूजशी बोलताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) अधिकारी म्हणाला, 'त्याला खांद्या जवळ दुखत होतं, मग त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आली.' स्पर्धेच्या या मोसमात आबिदने 6 सामन्यांमध्ये 52 च्या सरासरीने 766 रन केले आहेत, यात तीन शतकांचा समावेश आहे.

काहीच दिवसांपूर्वी आबिद अलीने बांगलादेश दौऱ्यावर (Bangladesh vs Pakistan) चांगली कामगिरी केली होती. 34 वर्षांच्या या डावखुऱ्या ओपनरने 88 च्या सरासरीने 263 रन केले होते, त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं होतं. आबिद अलीने पाकिस्तानकडून 16 टेस्टच्या 26 इनिंगमध्ये 49 च्या सरासरीने 1180 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 6 वनडेमध्ये त्याने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 234 रन केले.

First published:

Tags: Pakistan