ISSF WC : अभिषेक वर्माची ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री, साधला 'सुवर्ण'वेध

ISSF WC : अभिषेक वर्माची ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री, साधला 'सुवर्ण'वेध

याआधी अंजुम मुदगील, अपूर्वी चंडेला, सौरभ चौधरी आणि दिव्यांश सिंग पानवर यांनी ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली होती.

  • Share this:

बीजिंग, 27 एप्रिल: सध्या बीजिंगमध्ये सुरु असलेल्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अभिषेक वर्मानं भारतासाठी सुवर्णवेध साधला. वर्मानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. यासह 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली.

भारताकडून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारा तो पाचवा नेमबाज ठरला आहे. यामुळं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

याआधी अभिषेकनं 2018च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते, 2019च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. याआधी अंजुम मुदगील, अपूर्वी चंडेला ( 10 मीटर एअर रायफल), सौरभ चौधरी आणि दिव्यांश सिंग पानवर यांनी ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली होती. अभिषेकने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत 242.7 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर नाव कोरलं.

VIDEO : मोदींची मुंबईतील सभा, भाषण सुरू असतानाच अनेक लोक गेले निघून

First published: April 27, 2019, 2:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading