एका षटकात 17 चेंडू टाकणाऱ्या खेळाडूची निवृत्ती, धोनीने दिली होती संधी!

एका षटकात 17 चेंडू टाकणाऱ्या खेळाडूची निवृत्ती, धोनीने दिली होती संधी!

महेंद्रसिंग धोनीने संधी दिलेल्या क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. केवळ तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याची त्याला संधी मिळाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. या विजयाच्या जल्लोषात सध्या भारतीय संघा आहे. दरम्यान, भारताच्या एका क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. जवळपास 13 वर्षांच्या प्रथम श्रेणीतील क्रिकेट कारकिर्दीनंतर अभिषेक नायरने निवृत्तीचा निर्णय घेतला. सोशल मीडियावरून त्याने आपण निवृत्ती घेतल्याचं सांगितलं. अभिषेक नायरने मुंबई आणि पुद्दुचेरीकडून घरेलू क्रिकेट खेळलं आहे.

अभिषेक नायर कॅरेबियन प्रीमियर लीगचा संघ ट्रिनबागो नाइट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहे. त्याने गेल्याच महिन्यात निवृत्तीचा निर्णय बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितला होता. इन्स्टाग्रामवर निवृत्ती जाहीर करताना अभिषेक म्हणाला की, माझ्या कारकिर्दीत मला सहाकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. मला या खेळाने सर्वकाही दिलं. आता पुढे जाण्याची वेळ आहे. सर्वांचे पुन्हा आभार.

रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये मुंबईच्या यशात अभिषेक नायरचे मोठे योगदान आहे. त्याने 2006 मध्ये क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबईला सलग विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. अभिषेक नायर टीम इंडियाचा फलंदाज दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर आणि उन्मुक्त चंद यांचा मेंटर आहे. या खेळाडूंचा फिटनेस आणि खेळ याचं त्याने अनेकदा कौतुक केलं होतं.

धोनीच्या नेतृत्वाखाली अभिषेक नायरला तीन एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली होती. 2009 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तो तीन सामन्यात खेळला पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर संघातून बाहेर ठेवण्यात आलं. त्याला तीन सामन्यात एकदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याला खातंही उघडता आलं नाही. तसेच गोलंदाजीतही एकसुद्धा विकेट घेता आली नाही.

सध्या 36 वर्षांचा असेलला अभिषेक नायर सिकंदराबादमध्ये जन्मला. त्याचे आई-वडील केरळचे आहेत. मुंबईत लहानाचा मोठा झालेल्या अभिषेकच्या नावावर नको असलेला एक विक्रम आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात 17 चेंडूंचे शतक टाकण्याचा विक्रम केला आहे. इंटर झोन देवधर ट्रॉफीत त्याने साउथ झोनविरुद्ध एका षटकात 17 चेंडू टाकले होते. यात दहा वाइड आणि एक नो बॉल होता.

पाहा VIDEO : रोहितकडून अशी अपेक्षा नव्हती, विजयानंतर विराटनं केलं मोठं वक्तव्य

2012-13 च्या रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने मुंबईकडून 966 धावा केल्या होत्या. त्यावर्षी अष्टपैलू कामगिरीसाठी लाला अमरनाथ पुरस्कारही देण्यात आला होता. 2006 मध्ये अभिषेक नायरने निसार ट्रॉफीत कराची अर्बनविरुद्ध 152 धावांची खेळी केली होती. प्रथम श्रेणीत त्याने 103 प्रथम श्रेणी सामन्यात 5 हजार 749 धावा आणि 173 गडी बाद केले होते. तर 99 लिस्ट ए सामन्यात 2 हजार 145 धावा केल्या होत्या. याशिवाय 79 विकेटही घेतल्या आहेत.

BCCIचं चाहत्यांना मोठं दिवाळी गिफ्ट! मैदानात सामना पाहण्यासाठी भन्नाट ऑफर

SPECIAL REPORT : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!

Published by: Suraj Yadav
First published: October 23, 2019, 1:08 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading