Vijay Hazare Trophy : याला म्हणतात बर्थ डे गिफ्ट! वाढदिवसादिवशीच भारतीय गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी

Vijay Hazare Trophy : याला म्हणतात बर्थ डे गिफ्ट! वाढदिवसादिवशीच भारतीय गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी

भारतीय गोलंदाजानं स्वत:च्या 30व्या वाढदिवसाला एक अनोखी भेट दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : टीम इंडियाच्या स्थानिक खेळाडूनं घरच्या मैदानावर एक जबरदस्त कामगिरी केल आहे. त्यान चक्क आपल्या 30व्या वाढदिवसादिवशी हॅट्रिक घेत स्वत:ला अनोखी भेट दिली आहे. तमिळनाडू विरोधातल्या विजय हजारे करंडक स्पर्धेच्या (Vijay Hazare Trophy) अंतिम सामन्यात कर्नाटकच्या जलद गोलंदाजानं ही अनोखी कामगिरी केली. अभिमन्यू मिथून (Abhimanyu Mithun) असे या खेळाडूचे नाव आहे.

मिथूननं विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50व्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेत ऐतिहासिक कामगिरी केली. मजेशीर गोष्ट म्हणजे 25 ऑक्टोबर 1989ला बंगळुरू येथे अभिमन्यू मिथूनचा जन्म झाला. वाढदिवसाच्याच दिवशी त्यानं हॅट्रिक घेत या स्पर्धेत पाच विकेट घेण्याचीही कामगिरी केली.

खडतर प्रवास करत झाला गोलंदाज

कर्नाटकसाठी विजय हजारे करंडक स्पर्धेत हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज अभिमन्यू मिथून ठरला आहे. दरम्यान त्याचा आतापर्यंतचा प्रवास म्हणावा तसा सफल राहिलेला नाही आहे. मिथूननं आपल्या करिअरची सुरुवात गोलंदाज म्हणून नाही तर ज्वेलिअन थ्रोवर म्हणून केली होती. याआधी राज्यस्तरिय पातळीवर त्यानं आपले नशीब आजमावले होते. त्यानंतर आपल्या मित्राच्या सांगण्यावरून त्यानं क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.

17 वर्षांनंतर घेतला क्रिकेट खेळण्याचा निर्णय

अभिमन्यू वयाच्या 17 वर्षापर्यंत ज्वेलिअन थ्रोवर म्हणून काम करत होता. त्यानंतर त्यानं लेदरचा चेंडू वापरून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. मिथूननं आपल्या पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्याच अनन्य साधारण कामगिरी केली. पहिल्याच डावाच्या दुसऱ्या चेंडूवर त्यानं हॅट्रिक घेतली. मिथून 2009-10मध्ये रणजीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फलंदाजही ठरला होता. रणजीमध्ये त्यानं 47 विकेट घेण्याची कामगिरी केली होती.

अशी घेतली हॅट्रिक

1. ओव्हर 49.3 : सगळ्यातआधी शाहरूख खानला त्यानं आपला शिकार केलं. 27 धावा करत मनीषा पांडेच्या हाती त्यानं कॅच दिला.

2. ओव्हर 49.4 : पुढच्याच चेंडूवर त्यानं एम मोहम्मद (10) ची विकेट घेतली.

3. ओव्हर 49.5 : ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एम अश्विनला शुन्यावर बाद केले. हा हॅट्रिकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असे आहे अभिमन्यूचे करिअर

टीम इंडियासाठी 4 कसोटी सामन्यात त्यानं 9 विकेट घेतल्या आहेत. तर, 5 एकदिवसीय सामन्यात 3 विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 95 सामन्यात 304 विकेट घेतल्या आहेत. तर, 90 लिस्ट ए सामन्यात मिथूननं 123 विकेट घेतल्या आहेत. त्यानं 60 टी-20 सामनेही खेळले आहेत. यात 55 विकेट घेतल्या आहेत. तसेच, त्याच्या नावावर 1 हजार 739 विकेटही आहेत.

Tags:
First Published: Oct 25, 2019 02:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading