अभिमन्यूने असं भेदलं टीम इंडियाचं 'चक्रव्यूह', इंग्लंड दौऱ्यासाठी निवड

अभिमन्यूने असं भेदलं टीम इंडियाचं 'चक्रव्यूह', इंग्लंड दौऱ्यासाठी निवड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाने 4 स्टॅण्डबाय खेळाडूंची घोषणा केली आहे, यामध्ये अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Ishwaran) याचाही समावेश आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) भारतीय टीमची निवड झाली आहे. जवळपास 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या दौऱ्यासाठी टीम इंडियाने 20 खेळाडूंची घोषणा केली आहे, सोबतच 4 स्टॅण्डबाय खेळाडू इंग्लंडला जाणार आहेत. यामध्ये अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Ishwaran), प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna), अर्झान नागवासवाला (Arzan Nagwaswalla) आणि आवेश खान (Avesh Khan) यांचा समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यामध्ये जर एखाद्या ओपनरला दुखापत झाली तर इश्वरनला खेळण्याची संधी मिळू शकते.

उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनमध्ये जन्मलेल्या अभिमन्यू इश्वरन बंगालकडून रणजी ट्रॉफी खेळतो. सध्या 25 वर्षांचा असलेला इश्वरन 2018-19 साली आपल्या डावखुऱ्या बॅटिंगने प्रकाशझोतात आला होता.

टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणारा अर्झान नागवासवाला कोण आहे?

2018-19 साली रणजी ट्रॉफीच्या 6 मॅचमध्ये इश्वरनने तब्बल 861 रन केले होते, तसंच 2018 साली त्याची देवधर ट्रॉफीमध्येही इंडिया-ए साठी निवड झाली होती. 2019 साली इश्वरन इंडिया रेडकडून दुलीप ट्रॉफी खेळला. दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये इश्वरनने 153 रनची खेळी केली, या कामगिरीमुळे त्याला इंडिया ए मध्येही स्थान मिळालं.

यावर्षी जानेवारी महिन्यात अभिमन्यू इश्वरनला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठीही स्टॅण्डबाय खेळाडू म्हणूनच संधी मिळाली होती. अभिमन्यूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 46.96 च्या सरासरीने 4,227 रन केले, यामध्ये 13 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तसंच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 49.18 च्या सरासरीने 2,656 रन केले. टी-20 क्रिकेटमध्येही इश्वरनची सरासरी 33.64 आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे निवड समिती आणि विराट कोहलीने अभिमन्यूवर विश्वास दाखवला आहे.

18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. यानंतर 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान भारत इंग्लंडविरुद्ध (India vs England) त्यांच्या घरच्या मैदानात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

Published by: Shreyas
First published: May 7, 2021, 10:03 PM IST

ताज्या बातम्या