Home /News /sport /

'IPL मध्ये कोणीच बोली लावली नाही, पण आता टीम इंडियात', या खेळाडूची गर्जना

'IPL मध्ये कोणीच बोली लावली नाही, पण आता टीम इंडियात', या खेळाडूची गर्जना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) टीम इंडियाची निवड करण्यात आली. 20 जणांच्या या टीमसोबत 4 स्टॅण्डबाय खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Easwaran) याचाही समावेश आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) टीम इंडियाची निवड करण्यात आली. 20 जणांच्या या टीमसोबत 4 स्टॅण्डबाय खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Easwaran) याचाही समावेश आहे. टीम इंडियासोबत इंग्लंडला जायची संधी मिळाल्यामुळे इश्वरन खूश आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासारख्या दिग्गजांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल, असं इश्वरन म्हणाला आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोणत्याच टीमने विकत न घेतल्याबद्दलही परमेश्वरनने दु:ख व्यक्त केलं, पण टीम इंडियात संधी मिळाल्यामुळे आपण आनंदी असल्याचं इश्वरन म्हणाला. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, अभिमन्यू इश्वरन म्हणाला, 'मी खूप आनंदी आहे, राष्ट्रीय टीमसोबत असणं ही अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा मला फोन आला तेव्हा मी झोपलो होतो, पण बातमी वाचल्यावर मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही.' 'आयपीएलमध्ये कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही, त्यामुळे मी निराश झालो होतो, पण दोन महिन्यांमध्येच मी टीम इंडियाचा भाग आहे. यापेक्षा माझ्यासाठी काहीच मोठं नाही. पुढच्या मोसमात मी चांगला खेळेन, त्यामुळे मला आयपीएल 2022 मध्ये खेळण्याची संधी मिळेल,' असा विश्वास अभिमन्यूने व्यक्त केला. उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनमध्ये जन्मलेल्या अभिमन्यू इश्वरन बंगालकडून रणजी ट्रॉफी खेळतो. सध्या 25 वर्षांचा असलेला इश्वरन 2018-19 साली आपल्या डावखुऱ्या बॅटिंगने प्रकाशझोतात आला होता. 2018-19 साली रणजी ट्रॉफीच्या 6 मॅचमध्ये इश्वरनने तब्बल 861 रन केले होते, तसंच 2018 साली त्याची देवधर ट्रॉफीमध्येही इंडिया-ए साठी निवड झाली होती. 2019 साली इश्वरन इंडिया रेडकडून दुलीप ट्रॉफी खेळला. दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये इश्वरनने 153 रनची खेळी केली, या कामगिरीमुळे त्याला इंडिया ए मध्येही स्थान मिळालं. यावर्षी जानेवारी महिन्यात अभिमन्यू इश्वरनला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठीही स्टॅण्डबाय खेळाडू म्हणूनच संधी मिळाली होती. अभिमन्यूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 46.96 च्या सरासरीने 4,227 रन केले, यामध्ये 13 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तसंच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 49.18 च्या सरासरीने 2,656 रन केले. टी-20 क्रिकेटमध्येही इश्वरनची सरासरी 33.64 आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, England, IPL 2021, Team india

    पुढील बातम्या