मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /BCCI देणार धक्का, एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला खेळाडू होणार Team India चा Coach!

BCCI देणार धक्का, एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला खेळाडू होणार Team India चा Coach!

टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफचा (Team India Coach) कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड, बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग प्रशिक्षक आर.श्रीधर यांचा समावेश आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफचा (Team India Coach) कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड, बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग प्रशिक्षक आर.श्रीधर यांचा समावेश आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होईल, असं बोललं जातंय. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांनी द्रविडला या पदासाठी तयार केल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे विक्रम राठोड यांचीही बॅटिंग कोच म्हणून फेरनियुक्ती होण्याची शक्यता आहे.

फिल्डिंग कोच म्हणून माजी क्रिकेटपटू अभय शर्मा (Abhay Sharma) यांचं नाव आता समोर आलं आहे. अभय शर्मा सध्याचे फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांची जागा घेऊ शकतात. अभय शर्मा यांनी भारत ए, भारत अंडर-19 आणि राष्ट्रीय महिला टीमसोबत काम केलं आहे. फिल्डिंग कोचच्या पदासाठी अभय शर्मा अर्ज करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Team India चा प्रशिक्षक झाल्यानंतर राहुल द्रविडला मिळणार एवढं मानधन

बीसीसीआयच्या (BCCI) सूत्राने याबाबत बोलताना सांगितलं की, 'अभय शर्मा लवकरच या पदासाठी अर्ज करतील.' अर्ज करण्याची अखेरची तारीख 3 नोव्हेंबरला संपत आहे. अभय शर्मा यांनी एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही, पण त्यांनी 89 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये दिल्ली, रेल्वे आणि राजस्थानचं प्रतिनिधीत्व केलं. अभय 2016 सालच्या झिम्बाब्वे दौऱ्यातही टीम इंडियाचे फिल्डिंग कोच होते. त्याचवर्षी भारताच्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावरही ते गेले होते.

महिला टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यात कर्णधार हरमनप्रीत कौरसह इतर खेळाडूंनी अभय शर्मा यांच्या कामाचं कौतुक केलं होतं, पण यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांना बदलण्यात आलं. अभय शर्मा तीनवेळा अंडर-19 वर्ल्ड कप टीमसोबत होते. तसंच 2020 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपमध्यही अभय फिल्डिंग कोच होते. जवळपास 10 दौऱ्यांमध्ये ते इंडिया ए सोबतही गेले. तसंच एनसीएमध्येही त्यांनी राहुल द्रविडसोबत काम केलं आहे.

राहुल द्रविडची जागा घ्यायला या दिग्गज खेळाडूचा नकार, BCCI ची ऑफर धुडकावली

First published:
top videos

    Tags: BCCI, Team india