मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

एबी डिव्हिलियर्सने चाहत्यांना दिला मोठा धक्का, त्या निर्णयावर अजूनही ठाम

एबी डिव्हिलियर्सने चाहत्यांना दिला मोठा धक्का, त्या निर्णयावर अजूनही ठाम

आपल्या वादळी बॅटिंगने चाहत्यांची मन जिंकणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने (Ab de Villiers) त्यांनाच मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पुनरागमन करणार नसल्याचं एबी डिव्हिलियर्सने स्पष्ट केलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 18 मे : आपल्या वादळी बॅटिंगने चाहत्यांची मन जिंकणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने (Ab de Villiers) त्यांनाच मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पुनरागमन करणार नसल्याचं एबी डिव्हिलियर्सने स्पष्ट केलं आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने (Cricket South Africa) याबाबत माहिती दिली आहे. एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करायला नकार दिला आहे, त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या टीममध्ये त्याची निवड झाली नाही, असं बोर्डाने सांगितलं. दक्षिण आफ्रिकेची टीम वेस्ट इंडिजमध्ये 2 टेस्ट आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 10 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

एबी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे अंदाज वर्तवले जात होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येच एबीची दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड होईल, असं बोललं जात होतं. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानेही त्याच्याशी चर्चा केली, पण त्याने आपला निर्णय बदलायला ठाम नकार दिला. दक्षिण आफ्रिका बोर्डाचे क्रिकेट डायरेक्टर ग्रॅम स्मिथने एबी वेस्ट इंडिज दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो, असे संकेत दिले होते.

एबी डिव्हिलियर्सने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने 114 टेस्ट, 228 वनडे आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या, यात त्याने 47 शतकं केली. एबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये मात्र त्याने धमाका केला. यावर्षी 6 इनिंगमध्ये त्याने 51.75 च्या सरासरीने 207 रन केले.

First published:

Tags: Cricket, South africa