VIDEO : असा कॅच तुम्ही वर्ल्ड कपमध्येही पाहिला नसेल, पाहा टी-20चा थरार!

VIDEO : असा कॅच तुम्ही वर्ल्ड कपमध्येही पाहिला नसेल, पाहा टी-20चा थरार!

तब्बल दोन महिने ICC Cricket World Cupचा थरार संपल्यानंतर आता लंडनमध्ये सध्या टी-20 ब्लास्ट सुरू आहे.

  • Share this:

लंडन, 19 जुलै : तब्बल दोन महिने ICC Cricket World Cupचा थरार संपल्यानंतर आता लंडनमध्ये सध्या टी-20 ब्लास्ट सुरू आहे. यात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं इंग्लंडच्या या टी-20 स्पर्धेत पदार्पणाच धमाकेदार कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात केवळ 43 चेंडूत चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत त्यानं 88 धावा केल्या. मात्र, त्यानं सीमारेषेजवळ घेतलेला कॅच पाहून सर्वांनी त्याचे कौतुक केले.

टी-20 ब्लास्टमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी केल्यानंतर एबीनं, "येथील प्रेक्षक शानदार आहे. क्रिकेटचा स्थर उंचावला आहे. जगभरातील लोक हे सामने पाहत नसले तरी, या खेळ उच्च दर्जाचा आहे", असे मत व्यक्त केले. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या या सामन्यात एबीच्या खेळीचे सर्वांनी कौतुक केले.

वाचा- इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्याचा न्यूझीलंड करणार सन्मान! 

वर्ल्ड कपमध्ये एबी आणि दक्षिण आफ्रिका यांच्यत झालेल्या वादानंतर निवृत्ती घेतलेल्या एबीनं टी-20मध्ये खेळण्यास सुरुवात केली. तसेच, आयपीएल यांची तुलना होऊ शकत नाही असेही मत एबीनं व्यक्त केले.

वाचा- ICCने सचिनला Hall Of Fameमध्ये स्थान देण्यास केला उशीर? 'हे' आहे कारण

या सामन्यात एसेक्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 164 धावा केल्या. यात रेयान टेन यानं 46 चेंडूत 74 धावा केल्या. यात 3 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. याचा पाठलाग करताना एबीनं एकट्यानं शानदार 88 धावांची खेळी केली. मात्र, त्यानं घेतलेला कॅच सर्वांच्याच लक्षात राहिला.

वाचा- ICC च्या एका निर्णयानं 30 खेळाडूंचं करिअर उद्ध्वस्त!

खोटी घरभाडे पावती दाखवाल तर होणार ही कारवाई; इतर टॉप 18 बातम्या

First published: July 19, 2019, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading