VIDEO : डिव्हिलियर्सचा IPL अवतार! 360 डिग्रीचा असा शॉट तुम्ही कधीच पाहिला नसेल

VIDEO : डिव्हिलियर्सचा IPL अवतार! 360 डिग्रीचा असा शॉट तुम्ही कधीच पाहिला नसेल

Mr. 360 म्हणून ओळखला जाणाऱ्या एबी डिव्हिलियर्सचा हा शॉट अजिबात चुकवू नका.

  • Share this:

केप टाऊन, 07 डिसेंबर : एबी डिव्हिलियर्स हा फलंदाज त्याच्या विचित्र शॉटमुळे आणि आक्रमक फलंदाजीमुळे ओळखला जातो. मात्र डिव्हिलियर्सचा असा शॉट तुम्ही कधीच पाहिला नसेल. सध्या दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या मॅजेन्सी सुपर लीगमध्ये डिव्हिलियर्सचा भलताच शॉट पाहायला मिळाला.

मॅजेन्सी सुपर लीग सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळली जात आहे. जगातील अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत भाग घेत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्स या स्पर्धेत ताशवणे स्पार्टन्सकडून खेळत आहे. 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डिव्हिलियर्स अजूनही फलंदाजीमध्ये आक्रमक आहे. म्हणून क्रिकेटमध्ये डिव्हिलियर्सला 360 डिग्री फलंदाज असे म्हणतात.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणारा डिव्हिलियर्सचा या स्पर्धेत एक वेगळा अवतार पाहायला मिळाला. माजांसी सुपर लीगमध्ये नेल्सन मंडेला बे जायंट्सविरुद्धच्या त्याच्या शॉटमुळे गोलंदाजही स्तब्ध झाला.

18व्या षटकातील तिसरा बॉल ज्युनिअर डालानं यॉर्करने फेकला परंतु डीव्हिलियर्सने त्यावर स्विप मारत एक विचित्र शॉट खेळला. हा चेंडू विकेटकीपर आणि शॉर्ट थर्ड मॅनच्यावर चार धावांवर गेला. मात्र हा शॉट पाहून गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित हसू उमटले. या डावात एबी डिव्हिलियर्सने 38 चेंडूत 63 धावा केल्या. यात 6 चौकार तसेच षटकारांचा समावेश होता. षटकांच्या पहिल्या 5 चेंडूंवर ज्युनियर डालाने 28 धावा खर्च केल्या पण शेवटच्या चेंडूवर बुरेन हेंड्रिक्सच्या जोडीला डिव्हिलियर्स झेलबाद झाला.

 

View this post on Instagram

 

Only ABD can do this 🔥😦

A post shared by cricket Videos (@cricket.latest.videos) on

दरम्यान या सामन्यात डिव्हिलियर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 188 धावा केल्या. नेल्सन मंडेला बे जायंट्स संघाने दोन चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून सामना जिंकला. त्याच्यासाठी बेन डंकने नाबाद 99 धावांची खेळी केली. रायन टेन दसखातेने 33 आणि मार्को मारिसने 38 धावा केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 08:08 AM IST

ताज्या बातम्या