• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • मोठी बातमी! AB de Villiersने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा

मोठी बातमी! AB de Villiersने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा

AB de Villiers

AB de Villiers

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने (AB de Villiers ) शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने (AB de Villiers ) शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली. क्रिकेट जगतात 'मिस्टर 360 डिग्री' या नावाने तो प्रसिद्ध होता.

  काय म्हटले आहे ट्विटमध्ये?

  डिविलियर्सने म्हटले आहे की ‘हा खूप अविश्वसनीय प्रवास होता, पण मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणात मोठ्या भावांसह सामने खेळण्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि बेलगाम उत्साहाने खेळलो. आता मी ३७ वर्षांचा झालो आहे. ज्योत आता तितकी तेजस्वीपण जळत नाहीये.’ अशा आशयाची पोस्ट करत त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. डिविलियर्सने मे 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर जगभरातील विविध लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसत होता. आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो अखेरचे आयपीएल2021  हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसला होता. एबी डिव्हिलियर्सने आपल्या संपूर्ण T20 कारकिर्दीत 9424 धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्सच्या बॅटने 4 शतके, 69 अर्धशतके केली आहेत. 340 T20 सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 37.24 होती जी खरोखरच प्रशंसनीय आहे. मिस्टर 360 डिग्री या नावाने प्रसिद्ध असलेल्या डीव्हिलियर्सने आपल्या टी-20 कारकिर्दीत 436 षटकार ठोकले. यासोबतच त्याने 230 झेलही घेतले.
  Published by:Dhanshri Otari
  First published: