Home /News /sport /

AB de Villiers ची बॅट तळपली, केवळ 31 चेंडूत 16 षटकारांसह ठोकले शतक

AB de Villiers ची बॅट तळपली, केवळ 31 चेंडूत 16 षटकारांसह ठोकले शतक

AB de Villiers

AB de Villiers

On this day: दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने (AB de Villiers) मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. डिविलियर्सने आत्तापर्यंत अनेक मोठे मोठे विक्रम केले आहेत. यामध्ये त्याचा असा एक विश्वविक्रम आहे जो आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाही.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 18 जानेवारी: दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने (AB de Villiers) सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या तुफानी खेळाची चर्चा कायम आहे. डिविलियर्सने आत्तापर्यंत अनेक मोठे मोठे विक्रम केले आहेत. यामध्ये त्याचा असा एक विश्वविक्रम आहे जो आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाही, तो म्हणजे वनडेत सर्वात जलद अर्धशतक आणि शतक करण्याचा विश्वविक्रम डिविलियर्सच्या नावावर आहे. डिविलियर्सनेआजच्या दिवशीच म्हणजेच 18 जानेवारी 2015 मध्ये केवळ 31 चेंडूत 16 षटकारांसह शतक झळकावले होते. त्याचा हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे.2015मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज संघात 5 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 2 विकेट 439 धावा केल्या होत्या. यावेळी फलंदाजी करताना डिविलियर्सने हे विक्रम केले. या सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करताना हाशिम अमला (Hashim Amla) आणि रिली रोसोने (Rilee Rossow) 247 धावांची सलामीची भागीदारी केली. पुढे 39व्या षटकात रोसो झेलबाद झाल्याने एबी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला. यावेळी एबीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्याने केवळ 19 मिनिटात 16 चेंडूत हा विक्रम केला. यामध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे. यानंतर पुढे फलंदाजी करत एबीने अवघ्या 40 मिनिटात जगातील सर्वात वेगवान शतक ठोकले. हे त्याने 8 चौकार आणि 10 षटकारांच्या सहाय्याने केवळ 31 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याचा हा विक्रमदेखील आजतागायत कायम आहे. त्याने या सामन्यात केवळ 44 चेंडूत एकूण 9 चौकार आणि 16 षटकारांसह 149 धावा केल्या होत्या. वनडेत सर्वात जलद शतक करण्याच्या यादीत एबीच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कोरी अँडरसनचे (Corey Anderson) नाव येते. त्याने 2014मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 36 चेंडूत शतक केले होते.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Cricket news, Virat kohli

    पुढील बातम्या