मूंबई, 15 एप्रिल : सलग सहा पराभवांनंतर पहिला विजय मिळणारा बंगळुरूचा संघानं आयपीएलच्या मुंंबई विरोधात जोशात खेळताना दिसला. यावेळी वानखेडेच्या मैदानावर एबी डी'व्हिलियर्स नावाचं वादळ घोंगावताना दिसलं.
बंगळुरूनं एबीच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर मुंबईला घरच्या मैदानावर 172 धावांचे अव्हान दिलं. एबीनं विराट कोहलीची विकेट गेल्यानंतर सुरुवातीला संथ गतीनं फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर एबी आक्रमक झाला. त्यानं 51 चेंडूत 147च्या स्ट्राईकनं 75 धावा केल्या.
The ABD show at Wankhede 75(51) https://t.co/qIjwNCaLfd via @ipl
— Priyanka (@cricket_kida) April 15, 2019
एबीच्या या तुफान फलंदाजीत 6 चौकार आणि 4 षटकार यांचा समावेश होता. त्याला मोईन अलीनं चांगली साथ दिली. मोईन अलीनं 51 धावा केल्या, मात्र मोठ्या खेळीच्या नादात बाद झाला.
दरम्यान मुंबईनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या गोलंदाजांना सलामीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीला केवळ 8 धावात बाद करण्यात यश आले. तर, पार्थिक पटेलही 28 धावात बाद झाला. मात्र त्यानंतर मोईन अली आणि एबीनं आक्रमक फलंदाजी करत मुंबईसमोर धावांचा डोंगर उभा केला.
एबी डी'व्हिलियर्सच्या तुफान फलंदाजीला पोलार्डनं पुर्णविराम लावला. पोलार्डनं 74 धावांवर एबीला धाव बाद केलं. एबीनं 19व्या ओव्हरमध्ये पहिल्या दोन चेंडूत चौकार तर, मलिंगाच्या पहिल्याच चेंडूवर एक षटकार ठोकला.
पहिले सहा सामने सलग हरल्यानंतर पंजाब विरोधात श्रीगणेशा केल्यानंतर बंगळुरू संघाला दुसरा गमवावा लागला. पवन नेगीच्या शेवट्या ओव्हरला तब्बल 22 धावा हार्दिकनं केल्या.
घरच्या मैदानावर आम्हीच शेर असे दाखवत मुंबईनं शेवटच्या षटकात सामना जिंकला. पुन्हा मुंबईसाठी हार्दिक पांड्या धाऊन आला. आणि मुंबईनं पाच विकेटनं सामना जिंकला. टॉस जिंकत मुंबईनं बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. एबी आणि मोईन अलीच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर बंगळुरूनं 171 धावा केल्या. दरम्यान या धावांचा पाठलाग करत असताना मुंबईनं दणक्यात सुरु केली.
सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी'कॉक यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सलामीला आलेल्या फलंदाजांनी 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोईन अलीच्या 7व्य ओव्हरनं मुंबईचा खेळ बदलला आणि बंगळुरू संघ पुन्हा गेममध्ये आला.
VIDEO : राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांची मिमिक्री!