Home /News /sport /

IPL 2021 मध्ये एकही मॅच न खेळलेल्या खेळाडूची निवड कशी? आकाश चोप्रा हैराण

IPL 2021 मध्ये एकही मॅच न खेळलेल्या खेळाडूची निवड कशी? आकाश चोप्रा हैराण

श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने 20 सदस्यांच्या टीमची (India vs Sri Lanka) घोषणा केली आहे, पण या खेळाडूंच्या निवडीवरून माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) हैराण झाला आहे.

    मुंबई, 13 जून : श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने 20 सदस्यांच्या टीमची (India vs Sri Lanka) घोषणा केली आहे, पण या खेळाडूंच्या निवडीवरून माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) हैराण झाला आहे. आयपीएलमध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) कृष्णप्पा गौतमला (Krishnappa Gowtham) 9.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं, पण त्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आलं नाही. आयपीएलच्या या मोसमात एकही सामना न खेळलेल्या गौतमला टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाली आहे. श्रीलंकेमध्ये भारत 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. राहुल तेवतियाऐवजी (Rahul Tewatia) गौतमची निवड झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. राहुल तेवतियाला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये निवडण्यात आलं, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आकाश चोप्रा त्याच्या युट्युब चॅनलवर बोलताना टीम निवडीवरून आपण हैराण झाल्याचं म्हणला. 'राहुल तेवतियाने राजस्थान रॉयल्ससाठी मॅच खेळल्या, त्याची कामगिरी ठीक होती, खूप चांगली किंवा खूप खराब नव्हती. तरीही तुम्ही त्याची निवड केली नाहीत. या गोष्टी काय सांगतात? जिकडे त्याची निवड झाली होती, आता तिकडे कृष्णप्पा गौतमला संधी देण्यात आली आहे. मागच्या निवडीमध्ये गौतमचं नाव नव्हतं. आयपीएलमध्येही त्याने एकही सामना खेळलेला नाही. तो धोनीच्या टीममध्ये होता पण त्याला संधी मिळाली नाही, ही विचित्र गोष्ट आहे,' अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली. भारत-श्रीलंका यांच्यात पहिली वनडे 13 जुलै, दुसरी वनडे 16 जुलै आणि तिसरी वनडे 18 जुलैला होईल. तर टी-20 सीरिज 21 जुलैपासून सुरू होईल. दुसरी टी-20 23 जुलैला आणि तिसरी टी-20 25 जुलैला होईल. हे सगळे सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होतील. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय टीम हे सगळे सामने खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Team india

    पुढील बातम्या