Home /News /sport /

Aakash Chopra पुन्हा ट्रोल होणार! T20 World Cup साठी निवडली अशी टीम

Aakash Chopra पुन्हा ट्रोल होणार! T20 World Cup साठी निवडली अशी टीम

आकाश चोप्राने (Aakash Chopra) टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निवड केली आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने 16 भारतीय खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपसाठी संधी दिली आहे.

    मुंबई, 3 जून : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रावर (Aakash Chopra) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार खेळाडू कायरन पोलार्डने (Kieron Pollard) निशाणा साधला. आयपीएलच्या पुढच्या मोसमात मुंबई इंडियन्स पोलार्डला रिटेन करणार नाही, असं आकाश चोप्रा म्हणाला होता. पोलार्डनं एक ट्विट करून आकाश चोप्राला उत्तर दिलं. 'तुझे फॅन्स आणि फॉलोअर्स वाढत असतील. ते यापुढेही असेच वाढत रहावे', असं ट्विट पोलार्डनं केलं. या ट्विटमध्ये पोलार्डनं आकाश चोप्राला टॅगही केलं होतं. त्यानंतर काही वेळानं त्यानं हे ट्विट डिलिट केलं. पोलार्डने निशाणा साधल्यानंतर आता आकाश चोप्राने टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निवड केली आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने 16 भारतीय खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपसाठी संधी दिली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. आकाशच्या टीममध्ये हे खेळाडू हार्दिक पांड्या, केएल राहुल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, आवेश खान, कृणाल पांड्या, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, दीपक हुड्डा, कुलदीप यादव, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आयपीएलच्या आधारावर बनवली टीम आकाश चोप्राने ही टीम नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या कामगिरीवर बनवली आहे. त्याने हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा कर्णधार केलं आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात आयपीएल जिंकली. यानंतर हार्दिकच्या कॅप्टन्सीचं कौतुक होत आहे. रोहित, कोहली, पंतला जागा नाही आकाश चोप्राने त्याच्या टीममध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्यासारख्या दिग्गजांना टीममध्ये स्थान दिलं नाही. या तिन्ही खेळाडूंची आयपीएलमधली कामगिरी निराशाजनक झाली. मुंबई आणि दिल्लीला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नाही, तर आरसीबीही मुंबईमुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचली, पण तिकडेही त्यांना फार चमकदार कामगिरी करता आली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup, Team india

    पुढील बातम्या