Home /News /sport /

IND vs SA : 'हात जोडतो पण व्यंकटेश अय्यरला बॉलिंग द्या', भारतीय क्रिकेटपटूची टीम इंडियाला विनंती

IND vs SA : 'हात जोडतो पण व्यंकटेश अय्यरला बॉलिंग द्या', भारतीय क्रिकेटपटूची टीम इंडियाला विनंती

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी वनडे (India vs South Africa 2nd ODI) पार्लमध्ये सुरू आहे. दुसऱ्या वनडेमध्ये कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टीममध्ये कोणतेही बदल केले नाहीत, त्यामुळे व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) सहावा बॉलर म्हणून उपलब्ध आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी वनडे (India vs South Africa 2nd ODI) पार्लमध्ये सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर भारताला सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. दुसऱ्या वनडेमध्ये कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टीममध्ये कोणतेही बदल केले नाहीत, त्यामुळे व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) सहावा बॉलर म्हणून उपलब्ध आहे. पहिल्या वनडेमध्ये भारताचे बॉलर्स अपयशी ठरत असतानाही राहुलने व्यंकटेश अय्यरला बॉलिंग दिली नव्हती. राहुलच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. मधल्या ओव्हरमध्ये विकेट न मिळणं भारताच्या पराभवाचं कारण ठरलं. केएल राहुलनेही मॅचनंतर हेच कारण सांगितलं. यानंतर आता दुसऱ्या वनडेआधी भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) व्यंकटेश अय्यरला बॉलिंग द्यावी, अशी मागणी केली आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, 'माझी हात जोडून विनंती आहे, व्यंकटेश अय्यरला बॉलिंग द्या. तो बॉलिंग करत नसेल, तर मग त्याला टीममध्ये ठेवण्यात काय अर्थ आहे? अय्यरला बॉलिंग द्यायची नसेल, तर दुसऱ्याला खेळवा. मला व्यंकटेश अय्यरच्या बॉलिंगकडून अपेक्षा आहे. तो कशी बॉलिंग करेल, हे मला माहिती नाही. पण तो सीम बॉलर म्हणून पर्याय नक्कीच आहे.' टी-20 मध्ये व्यंकटेशच्या नावावर एक विकेट व्यंकटेश अय्यरने मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध भारतात झालेल्या टी-20 सीरिजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या तीन मॅचच्या सीरिजमध्ये त्याने 3 ओव्हर बॉलिंग केली होती. पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माने त्याला बॉलिंग दिली नव्हती, पण तिसऱ्या टी-20 मध्ये अय्यरने 3 ओव्हरमध्ये 12 रन देऊन 1 विकेट मिळाली होती. यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी निवडण्यात आलं. व्यंकटेश अय्यरकडे हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. लिस्ट ए मध्ये 19 विकेट व्यंकटेश अय्यरने दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी भारताची स्थानिक स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली बॉलिंग केली होती. त्याने 6 मॅचमध्ये 9 विकेट मिळवल्या. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट 6 रन प्रती ओव्हरचा होता. आतपर्यंत 31 लिस्ट ए सामन्यात त्याने 19 विकेट मिळवल्या. तसंच 56 टी-20 मध्ये त्याने 30 विकेट घेतल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या