24 नोव्हेंबर : भारतात खेळल्या गेलेल्या एका क्रिकेट सामन्यात एक टीम फक्त 2 रनवर ऑल आऊट झाली आहे. तर दुसऱ्या टीमने एक चौका मारून सामना आपल्या खिशात घातला आहे. बीसीसीआयच्या अंडर 19 महिला वनडे सुपर लीग स्पर्धेमध्ये ही मॅच खेळली गेली.
या सामन्यात नागालॅंड आणि केरला हे दोन महिला संघ आमने सामने होते. यात नागालॅंडचा संघ पहिले फलंदाजी करायला उतरला. तर केरळच्या बॉलर्सने नागालॅंडच्या 9 खेळाडूंना शून्य धावांवरच आऊट केलं. मेनकाने फक्त 1 रन काढला. तर एक वॉईड बॉल देण्यात आला. अशा प्रकारे नागालँडचं धावफलक 2वर सर्वबाद असं झालं
तर दुसरीकडे केरळाच्या टीमने एकाच बॉलमध्ये सामना जिंकला.अन्सू एस राजू ने एक चौका ठोकला आणि सामना काबीज केला.सगळ्यात कमी धावांचं लक्ष्य असलेला सामना म्हणून या सामन्याकडे पाहिलं जातं आहे. तसंच सगळ्यात कमी चेंडूमध्ये सामना जिंकण्याचा रेकॉर्डही केरळच्या टीमच्या नावावर झाला आहे.