मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या काही तासांपूर्वी धोनीची पत्नी साक्षीने केली भावनिक पोस्ट

क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या काही तासांपूर्वी धोनीची पत्नी साक्षीने केली भावनिक पोस्ट

साक्षी आणि धोनी यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2010मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळी धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. आता धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

साक्षी आणि धोनी यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2010मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळी धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. आता धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

कॅप्टन कूलने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची एक्झिट जाहीर केली आहे.

मुंबई, 15 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट क्षेत्रातील कायम चर्चेत असलेला कर्णधार एम.एस. धोनी याने आंतरराष्ट्रीय किक्रेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे क्रिकेट व धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी माहीने आपण आतंरराष्ट्रीय किक्रेटमध्ये बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. याच्या काही तासांपूर्वी त्याची अर्धांगिनी साक्षी सिंह धोनी हिने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली होती. साधारण 3 तासांपूर्वी साक्षीने एक पोस्ट शेअर केली होती.

यामध्ये तिने Major Mahi Missing असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. धोनीच्या सन्यासाच्या बातमीनंतर त्याचं चाहते दु:खी झाले आहेत. मैदानातील त्यांनी गाजवलेल्या फटकारांची चर्चा कायम राहिल, अशी भावना त्याचे चाहते व्यक्त करीत आहेत. यातच त्याची पत्नी साक्षी ही कायम त्याच्यासोबत होती.

View this post on Instagram

Welcome home ! @mahi7781 missing you ...

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

सुशांत सिंह राजपूत याने धोनीच्या जीवनपटावरील साकारलेल्या चित्रपटानंतर धोनी चाहत्यांच्या आणखी जवळ गेला होता. सुशांतच्या अभिनयामुळे धोनीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत. अनेकांनी धोनीला न जाण्याची विनंती केली आहे.

View this post on Instagram

Major Mahi missing @mahi7781 !

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट मधून यापूर्वीच धोनीने निवृत्ती घेतली होती. आता आंतरराष्ट्रीय एकदिवस आणि टी20 क्रिकेटमध्ये एकदिवसीय विश्वचषक, T20 विश्वचषक आणि चँपियन्स ट्रॉफी या ICC च्या तीनही महत्त्वाच्या स्पर्धा धोनी कर्णधारपदी असताना भारताने जिंकल्या आहेत. त्यामुळे माहीला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानलं जात होतं. कॅप्टन कूलने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची एक्झिट जाहीर केली आहे. धोनी आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्त झाला असला, तरी IPL मध्ये मात्र तो दिसत राहणार आहे.

First published:
top videos