Home /News /sport /

सानिया मिर्झाच्या फार्महाऊसमध्ये गायीला घातली गोळी? अखेर टेनिस स्टार म्हणाली...

सानिया मिर्झाच्या फार्महाऊसमध्ये गायीला घातली गोळी? अखेर टेनिस स्टार म्हणाली...

जेव्हा गायीला गोळी घालण्यात आली तेव्हा सानिया मिर्झा तेथे हजर असल्याचे सांगितले जात आहे

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झावर आरोप करण्यात आला आहे की, तिच्या फार्म  हाउसवर गायीला गोळी घालण्यात आली होती. मात्र सानिका मिर्झा हिने सर्व आरोप फेटाळले आहेत. सानियाने गुरुवारी एक जबाब जारी केला आहे. त्यात लिहिलं आहे की, त्यांचा कोणताची फार्महाऊस नाही. याबाबत केले जाणारे वक्तव्य चुकीचे आहेत. भाजप आमदार राजा सिंह यांनी आरोप केला आहे की, सानिया मिर्झाच्या फार्म हाउसच्या सिक्युरिटी गार्डने एका गायीवर गोळी चालवली होती. ते म्हणाले की, सानिया त्यावेळी फार्महाऊसवर हजर होती. ते म्हणाली, राज्य सरकार या प्रकरणाचा तपास करीत आहे. आता सानियाने याबाबत खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केला जात आहेत. विखराबाद जिल्ह्यातील पारिगीमधील एक फार्म हाऊसवर एका गायीला गोळी घालण्यात आली, ज्याचा माझ्याशी संबंध असल्याची चुकीची बातमी प्रसिद्ध केली जात आहे. ती पुढे म्हणाली की, सुरुवातीला मी अशा बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया देणार नव्हते. मात्र आता या प्रकरणात मी माझी बाजू स्पष्ट करीत आहे. पारिगीमध्ये माझा फार्महाऊस नाही. हे ही वाचा-Jio युजरसाठी मोठी बातमी, 150 रुपयांपेक्षा कमी रिचार्जमध्ये मिळवा 24GB डेटा फ्री ज्या व्यक्तीचा संबंध फार्महाऊस आणि गायीला गोळी मारण्याची बातमी सांगितली जात आहे, त्याच्याशी किंवा त्या व्यक्तीच्या नावाचा कोणताही व्यक्ती माझ्याकडे काम करीत नाही. शेवटी मला इतकच म्हणायचं की मी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाहेर आहे.  ती पुढे म्हणाली की, मला अपेक्षा आहे की या चुकीच्या बातम्यांवर पूर्णविराम लागेल आणि भविष्यात माझं नाव अशा कोणत्याही बातमीशी जोडलं जाणार नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sania mirza, Tennis player

    पुढील बातम्या