पी.व्ही. सिंधूला मिळाली अपहरणाची धमकी, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

पी.व्ही. सिंधूला मिळाली अपहरणाची धमकी, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

ऑलिंपिक रौप्य पदक विजेती आणि बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव उंचावणाऱ्या पी.व्ही.सिंधूचे लवकरच अपहरण होणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 17 सप्टेंबर:  ऑलिंपिक रौप्य पदक विजेती आणि बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव उंचावणाऱ्या पी.व्ही.सिंधूचे लवकरच अपहरण होणार आहे. होय, ही कोणतीही अफवा वैगरे नाही. अगदी पक्की बातमी आहे. विशेष म्हणजे सिंधूच अपहरण पैशांसाठी वैगरे नव्हे तर लग्नासाठी केले जाणार आहे. वाचून तुम्हाला धक्काबसेल पण सिंधूच अपहरण होणार आहे हे आम्ही नव्हे तर खुद्द अपहरणकर्त्याने सांगितले आहे.

तामिळनाडूमधील रामनाथपूरम जिल्ह्यातील ही घटना आहे. जिल्हाधिकारी नेहमी प्रमाणे आठवड्याची बैठक घेत होते. या बैठकीत नागरिक त्यांचे अर्ज, विनंती जिल्हाधिकाऱ्याने देत होते. सर्वसाधारण या बैठकीत नागरिक त्यांच्या समस्या किंवा सरकारी योजनासंदर्भातील अर्ज घेऊन येतात. पण यातील एक अर्ज पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना धक्काच बसला. 70 वर्षाच्या एका व्यक्तीने  चक्क 24 वर्षीय पी.व्ही.सिंधूशी लग्न करण्यासाठी अर्ज केला होता. इतक नव्हे तर अर्जदाराने असेही म्हटले आहे की जर सिंधूसोबतच्या लग्नासाठी आवश्यकत्या गोष्टींची पुर्तता केली नाही तर तिचे अपहरण करेन असे म्हटले आहे.

धक्कादायक म्हणजे सिंधूशी लग्न करण्यासाठी अर्जकरणाऱ्याने स्वत:चे वय 16 असल्याचा अजब दावा केला आहे. अर्जदाराने स्वत:ची जन्मतारीख 4 एप्रिल 2004 अशी सांगितली आहे. सिंधूपासून आपण प्रचंड प्रभावित झालो असून तिला आयुष्याचा जोडीदार करण्याची इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी काय केले याची माहिती मिळाली नाही. पण चक्क नातवाच्या वयाच्या मुलीशी लग्न करण्याचा अर्ज करून Malaisamy याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काहीच दिवसांपूर्वी सिंधूने जागतिक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली होती. गेल्याच महिन्यात सिंधूनं जपानच्या नोहामी ओकुहारा विरोधात एकतर्फी विजय मिळवला. सिंधूनं ओकुहाराचा 21-7, 21-7नं पराभव केला. त्यानंतर फोर्ब्सनं जाहीर केलेल्या यादीत सिंधू जगभरातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत येणारी एकमेव भारतीय खेळाडू ठरली होती. या यादीत पहिल्या क्रमांकावर टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स हिचा क्रमांका लागतो. या यादीत सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. सिंधू वर्षाला 5.5 मिलियन डॉलर म्हणजेच 38.9 कोटी कमवते.

VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: p v sindhu
First Published: Sep 17, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या