टीम इंडियात होणार मोठे बदल, 2023 वर्ल्ड कपमध्ये मिळणार 'या' सहा खेळाडूंना संधी

ICC Cricket World Cupमध्ये विराटसेना आलेल्या अपयशामुळं आता भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 07:39 PM IST

टीम इंडियात होणार मोठे बदल, 2023 वर्ल्ड कपमध्ये मिळणार 'या' सहा खेळाडूंना संधी

ICC Cricket World Cupमध्ये विराटसेना आलेल्या अपयशामुळं आता भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात. 2023चा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. त्यामुळं या वर्ल्ड कपमध्ये बीसीसीआय युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो.

पंजाबकडून रणजी खेळणारा शुभमन गील भारतीय क्रिकेटचा उभरता चेहरा बनू शकतो. वयाच्या केवळ 19व्या वर्षात गीलनं जवळ जवळ सर्व स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत, चर्चेचा विषय बनला आहे. 2018मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये गीलला सलामीवीराचा पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळणाऱ्या या खेळाडूनं चांगली कामगिरी केली होती.

मुंबईच्या या खेळाडूनं आपल्या खेळीच्या जोरावर साऱ्या जगाचे लक्ष वेधले. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये शॉनं धमाकेदार कामगिरी केली. तसेच, आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या शॉनं 150च्या स्ट्राईकनं फलंदाजी केली. एवढेच नाही तर भारतासाठी कसोटी सामन्यात खेळलेल्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्यानं शतकी खेळी केली होती.

आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा युवा कर्णधार श्रेयस अय्यर भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाजीचा प्रश्न सोडवू शकतो. अय्यरनं 50च्या सरासरीनं प्रथम श्रेणीत धावा केल्या आहेत. तर, 2015-2016च्या ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सराव सामन्यात त्यानं 210 चेंडूत 202 धावांची नाबाद खेळी केली होती.

आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा दीपक चहर भारतीय गोलंदाजी मजबूत करू शकतो. चहर जसप्रीत बुमराहला चांगली साथ देऊ शकतो. आयपीएल 2019मध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चहर तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं आयपीएलमध्ये 22 विकेट घेतल्या होत्या.

Loading...

लेफ्ट आर्म जलद गोलंदाज खलील अहमद आपल्या शानदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलच्या त्याच्या खेळीमुळं खलीलला भारतीय संघात शामिल करण्यात  आले होते. खलीलीनं आशियाई चषक स्पर्धेत भारतीय संघाकडून पदार्पण केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...