मेस्सीचे पुन्हा निवृत्तीचे संकेत

मेस्सीचे पुन्हा निवृत्तीचे संकेत

  • Share this:

20 मार्च : विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाला जेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरलो, तर राष्ट्रीय संघ सोडण्याचे हे माझे एकमेव कारण असेल, असं वक्तव्य करीत स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहे.

बार्सिलोना : ला लीगा, चॅम्पियन्स लीग अशा अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपल्या एफसी बार्सिलोना या क्लबसाठी धडाकेबाज खेळी करणारा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र फारसा चमकला नाही. अर्जेंटिनाचा मुख्य खेळाडू असलेल्या मेस्सीकडून संघाला आणि देशवासीयांना नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात, मात्र प्रत्येक मोक्याच्या वेळी मेस्सी अपयशी ठरला आहे.

'रशियामध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाला जेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरलो, तर राष्ट्रीय संघ सोडण्याचे हे माझे एकमेव कारण असेल,' असं म्हणत मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहे. त्याच्या निवृत्तीच्या संकेतामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2018 11:59 PM IST

ताज्या बातम्या