IPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू

IPL 2019 : मुंबईच्या पराभवात हुकुमी एक्का ठरला राजस्थानचा 'हा' 17 वर्षीय खेळाडू

करो या मरोच्या सामन्यात आज या फलंदाजाच्या महत्त्वपुर्ण खेळीनं राजस्थानला विजय मिळवून दिला.

  • Share this:

जयपूर, 20 एप्रिल : सध्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात सर्व संघाचं लक्ष लागलं आहे ते गुणतालिकेकडं. पहिले चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत, त्यामुळं पहिल्या चार संघात येण्यासाठी संघांची चढाओढ सुरु आहे. त्यातच आज अगदी मोक्याची क्षणी राजस्थाननं मुंबईला 4 विकेटनं नमवलं.

राजस्थानच्या या विजयात मोलाचा वाटा होता तो 17 वर्षांचा रियान पराग. रियान परागनं कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत राजस्थानला विजय मिळवून दिला. परागनं 29 चेंडूत 43 धावा केल्या. रियाननं चेन्नई विरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थानकडून पदार्पण केलं आहे. केवळ 7 धावांमुळं त्याचा अर्धशतक हुकलं.

रियाननं आपलं अर्धशतक पुर्ण केलं असत तो, कमी वयात अर्धशतक करणारा फलंदाज ठरला असता, तर आसामचा पहिलाच फलंदाज झाला असता. 2013 साली संजू सॅमसननं तर, 2018मध्ये पृथ्वी शॉनं वयाच्या 18व्या वर्षी अर्धशतक ठोकलं होतं.

रियाननं 17 वर्ष 152 दिवसात राजस्थानकडून पदार्पण केलं होतं. आसाम सारख्या छोट्याशा राज्यात स्थायिक असलेल्या रियाननं वयाच्या 15व्या वर्षी स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. हैदराबादच्या विरोधात त्यानं आपलं पदार्पण केलं. रियान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला आदर्श मानतो. तो फलंदाजीबरोबर लेग ब्रेक गोलंदाजी करतो.

काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि रियान यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रियाननं 2007ला पाकिस्तान विरोधात गुवाहाटी येथे झालेल्या मालिकेत धोनीची भेट घेतली होती. तब्बल 12 वर्षांनी त्यानं आयपीएलच्या बाराव्या हंगामात धोनीची भेट घेतली. विशेष म्हणजे रियान केवळ 4 वर्षांचा होता, जेव्हा धोनीनं आपलं पदार्पण केलं होतं. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात रियानला धोनीने झेलबाद केलं. त्यानंतर त्यांचा फोटो व्हायरल झाला होता.

2018च्या अंडर 19 विश्वकप संघातही रियानला स्थान देण्यात आलं होतं. त्याला विश्वचषकात चार सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला केवळ 17 धावा करता आल्या तर, 3 विकेट त्यानं घेतल्या. याआधी त्यानं सैय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक स्पर्धा गाजवली होती. या स्पर्धेत त्यानं 125च्या स्ट्राईक रेटनं 175 धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

VIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद

First published: April 20, 2019, 8:53 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading