क्रिकेटला मिळाला मलिंगाचा डुप्लिकेट! यॉर्करचा VIDEO पाहून व्हाल हैराण

श्रीलंकेला मिळाली लसिथ मलिंगाची कार्बन कॉपी.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 03:26 PM IST

क्रिकेटला मिळाला मलिंगाचा डुप्लिकेट! यॉर्करचा VIDEO पाहून व्हाल हैराण

कोलंबो, 27 सप्टेंबर : क्रिकेट जगतातला सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगानं वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाच्या गोलंदाजीपुढे कोणताही फलंदाज आपला टिकाव ठरू शकलेला नाही. मात्र असलेल्या पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्य होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं मलिगानं एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. 2010मध्ये मलिंगा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं मलिंगा आता फक्त आपलं लक्ष संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्याकडे करणार आहे.

मलिंगानं कसोटी सामन्यात 101 तर 226 एकदिवसीय सामन्यात 338 विकेट घेतल्या आहेत. यातच आता श्रीलंकेला लसिथ मलिंगाची कार्बन कॉपी सापडली आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून मलिंगाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मलिंगाच्या डुप्लिकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-IPLमध्ये धमाका करणारा टीम इंडियाचा शिलेदार करणार कमबॅक? चौथ्या क्रमांकासाठी दावा

श्रीलंकेत सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेटमध्ये श्रीलंकेला नवा मलिंगा सापडला आहे. मथीशा पथिराना अशा या 17 वर्षीय गोलंदाजाचे नाव असून त्याची बॉलिंग स्टाईल हुबेहुब मलिंगासारखी आहे.

 

View this post on Instagram

 

😊😘🔇

A post shared by MATHEESHA PATHIRANA (@m.a.t.h.i.y.a_99) on

वाचा-रोहितचा विराट अवतार! भरमैदानात गोलंदाजाला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

हा व्हिडिओ पाहून मलिंगा आणि मथीशा यांच्यातील फरक तुम्हालाही कळणार नाही. मथीशानं आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच 7 धावा देत 6 विकेट घेतल्या. स्थानिक सामन्यात मथीशा त्रिनिटी कॉलेजचे प्रतिनिधित्व करत होता. त्याच्या या गोलंदाजीमुळं त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले आहे.

वाचा-विराटची चिंता वाढली, भारताचं कसोटीतील सिंहासन धोक्यात!

SPECIAL REPORT : 'या' अवलियाच्या टाइपिंगमधून तयार होतात पोट्र्रेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 02:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...