S M L

149 चौकार, 67 षटकार आणि धावा 1045 !, नवी मुंबईच्या तनिष्काचा विश्वविक्रम

सेमी फायनलमध्ये तनिष्कने दोन दिवसांच्या खेळीत ५१५ चेंडूत नाबाद 1 हजार 4 रनची रेकॉर्ड ब्रेक खेळी केलीये.

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2018 11:17 PM IST

149 चौकार, 67 षटकार आणि धावा 1045 !, नवी मुंबईच्या तनिष्काचा विश्वविक्रम

30 जानेवारी : क्रिकेटच्या मैदानात आज आणखी एक 'तनिष्क' अवतरलाय. या छोट्या 'सचिन'ने नाबाद 1045 धावा करून प्रणव धनावडेचा वर्ल्ड रेकाॅर्ड मोडीत काढलाय. या नव्या क्रिकेटचं नाव आहे तनिष्क गवते...

नवी मुंबईत अंडर 14 मुंबई शिल्ड क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलीये. या स्पर्धेत नवी मुंबईचा स्टार तनिष्क गवते याने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी खेळी खेळलीये. सेमी फायनलमध्ये तनिष्कने दोन दिवसांच्या खेळीत ५१५ चेंडूत नाबाद 1 हजार 4 रनची रेकॉर्ड ब्रेक खेळी केलीये. वर्ल्ड रेकॉर्डची नोंद असलेल्या कल्याणच्या प्रणव धनावडेचा त्याने रेकॉर्ड तोडलाय.

प्रणवने 1 हजार 9 रन केले होते. हा रेकॉर्ड तोडत आज तनिष्कने 1 हजार 45 रन केले आहेत.

दोन दिवसांच्या सेमी फायन मध्ये यशवंतराव चव्हाण स्कूलने 1 हजार 324 रनची खेळी खेळलीय. त्य़ापैकी 1 हजार 45 रन हे एकट्या तनिष्कने केले आहेत. 515 चेंडूत तनिष्कने 149 चौकार तर 67 षटकार लगावले आहे.

ऑल रॉउंडर असलेल्या तनिष्कने पहिल्या दिवशी 410 रन काढले होते. ऑल राउंडर खेळी खेळणाऱ्या तनिष्क राईटम ऑफ आणि लेग स्पिन ही टाकतो. 13 वर्षांचा ओपनिंग बॅट्समन असलेला तनिष्क यशवंतराव चव्हाण स्कूल मध्ये 8 वीत शिकत आहे.

तनिष्कच्या आजच्या कामगिरीने तनिष्कवर नवी मुंबईत शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दोन दिवसांनी होणाऱ्या फायनलमध्ये तनिष्कच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 11:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close